Nagar Census 2027: नगर जिल्ह्यात जनगणना-2027 सुरू; घरगणना मोहीम वेगात

25 हजार नागरिकांनी स्वगणना पूर्ण; 8 हजारांहून अधिक कर्मचारी घराघरात जाऊन माहिती संकलन करत आहेत
Nagar Census 2027
Nagar Census 2027Pudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्वगणनेस म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास 25 हजार नागरिकांनी स्वत: घरांची ऑनलाईन माहिती अपलोड केली आहे. प्रगणकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरगणनेस शनिवारपासून (दि.16) प्रारंभ झाला आहे. प्रगणक गावागावांत जाऊन घरांची गणना करु लागले आहेत. 14 जूनपर्यंत 2026 पर्यंत घरगणना मोहीम सुरू राहणार आहे.

Nagar Census 2027
Karjat Water Crisis: कर्जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई; 7 टँकरद्वारे 9 गावांना पाणीपुरवठा सुरू

देशात 1872 पासून जनगणनेची परंपरा सुरु असून, स्वातंत्र्यानंतरची ही 8 वी जनगणना आहे. जनगणना-2027 ही दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.

Nagar Census 2027
Nagar Water Crisis: नगर जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर; 87 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

ही जनगणना-2027 आता नव्या डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांसाठी 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध केली होती. परंतु याला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

Nagar Census 2027
Fake Driving School Scam: कर्जतमध्ये बनावट ड्रायव्हिंग स्कूलचा धंदा; नियमबाह्य प्रशिक्षणामुळे नागरिकांची फसवणूक

जनगणनेसाठी 6 हजार 869 प्रगणक व 1 हजार 145 पर्यवेक्षक असे 8 हजार 14 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षित प्रगणक शनिवारपासून (दि.16) आपापल्या गटातील घरांची गणना करु लागले आहेत. घरमालकांना 33 प्रश्न विचारुन ती माहिती ऑनलाईन अपलोड केली जात आहे. 14 जूनपर्यंत मोहीम सुरू राहणार असून, महिनाभराच्या कालावधीत प्रत्येक प्रगणकाला जवळपास 180 घरांची माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे.

Nagar Census 2027
Ahilyanagar Liquor Theft Gang:संगमनेर–नाशिक दारू चोरी रॅकेट उघड; आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

जनगणना राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी आलेल्या प्रगणकाला आपापल्या घराबाबतच्या 33 प्रकारच्या प्रश्नांची माहिती द्यावी. यामध्ये घरांची संख्या, घरांचा प्रकार, कुटुंबाची माहिती तसेच सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश आहे. घराबाबतची अचूक व विश्वासार्ह माहिती देऊन प्रगणकाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news