Nagar DJ Ban Protest: डीजे बंदीविरोधात नगरमध्ये साऊंड व्यावसायिकांचे आमरण उपोषण!

सरसकट बंदीऐवजी नियमांच्या अधीन व्यवसायास परवानगी देण्याची मागणी; हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
Nagar DJ Ban Protest
Nagar DJ Ban ProtestPudhari
Published on
Updated on

नगर: डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर घातलेल्‍या सरसकट बंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने बंदी घालण्याऐवजी नियम व अटींचे बंधन घालावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Nagar DJ Ban Protest
Parner Sugar Factory Scam: पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात चोरडिया बंधूंची चौकशी; २३ कोटींच्या व्यवहारावर पोलिसांचा तपास

गणेशोत्‍सवानिमित्त डीजेवर बंदी घालण्‍यात आली आहे. त्‍यामुळे या व्‍यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. या बंदीविरोधात या व्‍यावसायिकांनी शुक्रवारपासून (दि.१८) जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. डीजे व्यवसायावर चालक, ऑपरेटर, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बँकांचे कर्ज, वाढते व्याजदर आणि व्यवसायावरील निर्बंध यामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

Nagar DJ Ban Protest
Eco Friendly Ganpati Idol: रद्दीतून साकारला ‘जय भवानी’ मानाचा गणपती; मतिमंद विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला अनोखे रूप

या आंदोलनात राहुरी तालुका साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साळवे, श्रीगोंदाचे मंगेश घोडके, पाथर्डीचे नय्युम शेख, शेवगावचे सचिन कराळे, नेवाशाचे प्रशांत मोटे, श्रीरामपूरचे युवराज भागवत, राहात्याचे नीतीकेश थेटे यांच्यासह साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Nagar DJ Ban Protest
Akole FDA Action: अकोल्यात 'एफडीए' ची एन्ट्री; चार टपऱ्यांवर धाडी, पाच जण ताब्यात

डीजेवरील अनावश्यक निर्बंध तत्‍काळ हटवावेत, नियमांमध्ये राहून डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, परवानगी प्रक्रिया सुलभ, स्पष्ट आणि पारदर्शक करावी, लग्नसोहळा व इतर शुभकार्यांसाठी पोलिस परवानगीची अट शिथिल करावी, डीजे व्यावसायिक व ऑपरेटरवर होणारे हल्ले व अमानुष वागणूक रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आदी विविध मागण्‍यांचा निवेदनात समावेश आहे.

Nagar DJ Ban Protest
Ahilyanagar District Bank: राज्यात सत्ता ज्यांची, बँकेत ताकद त्यांची! जिल्हा बँक अन् पाच वर्षांचे सत्ता समीकरण!

डीजे व्यावसायिक म्हणतात...

  • ध्वनिमर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करू

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा

  • सर्वच व्यावसायिकांना दोषी ठरवून सरसकट बंदी अन्यायकारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news