Parner Sugar Factory Scam: पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात चोरडिया बंधूंची चौकशी; २३ कोटींच्या व्यवहारावर पोलिसांचा तपास

पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणातील नऊ आरोपींच्या बँक खात्यांवर सुमारे २३ कोटी रुपये पाठवल्याच्या व्यवहारासंदर्भात अतुल चोरडिया आणि अशोक चोरडिया यांची चौकशी होणार आहे. पारनेर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.
Parner Sugar Factory Scam
Parner Sugar Factory ScamPudhari
Published on
Updated on

पारनेर: पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री घोटाळ्याच्या गुन्ह्यातील नऊ आरोपींच्या बँक खात्यांवर सुमारे तेवीस कोटी रुपये पाठवणारे पुण्याचे अतुल चोरडिया व अशोक चोरडिया या बड्या उद्योजकांची पारनेर पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

पारनेरचे पोलिस निरीक्षक आणि तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांनी चोरडिया बंधूंना तपासाकामी पारनेर पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याच्या नोटीस बजावली आहे.

जुन महीण्यात या गुन्ह्याचा तपास पारनेर न्यायालयाच्या निगराणीत गेल्याचा आदेश झाल्यानंतर थंडावलेल्या तपासाने पुन्हा एकदा गती घेतली आहे.

पारनेर साखर कारखाना राज्य सहकारी बॅकेकडून लिलावात खरेदीकरीता चोरडिया बंधूंनी पुण्याचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या कुटुंबातील सदस्य नऊ आरोपींच्या खात्यात सुमारे तेवीस कोटी रुपये रकमा पाठवल्या आहेत.

Parner Sugar Factory Scam
Eco Friendly Ganpati Idol: रद्दीतून साकारला ‘जय भवानी’ मानाचा गणपती; मतिमंद विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला अनोखे रूप

या रकमा आरोपींनी त्यांच्या क्रांती शुगर कंपनीत न गुंतवता थेट राज्य सहकारी बँकेला परस्पर पाठवल्या होत्या व त्या बदल्यात क्रांती शुगर कंपनीकरिता साखर कारखान्याची मालमत्ता खरेदी केली होती.

केवळ कागदोपत्री अस्तित्व असलेल्या क्रांती शुगर कंपनीने कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा पारनेर कारखाना कसा खरेदी केला याबाबत आक्षेप घेऊन कारखाना बचाव समितीने गुन्हा दाखल केला आहे.

Parner Sugar Factory Scam
Akole FDA Action: अकोल्यात 'एफडीए' ची एन्ट्री; चार टपऱ्यांवर धाडी, पाच जण ताब्यात

कारखाना बचाव समितीचा आरोप आहे की, चोरडिया बंधूंनी गुंतवलेला हा सर्व कर चुकवलेला पैसा असून, आरोपींनी त्यातून मालमत्ता खरेदी केल्याचे दाखवून पुन्हा त्याच मालमत्तेवर राज्य सहकारी बँकेने आरोपींना ३४० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे.

अशाप्रकारे आरोपींनी काळा पैसा पांढरा केला आहे. त्यासाठी आरोपींना या प्रकरणात आर्थिक रसद पुरवठा करणाऱ्या चोरडीया बंधूंची सखोल चौकशीची मागणीची मागणी कारखाना बचाव समितीने पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, असे कारखाना बचाव समितीचे वकील रामदास घावटे यांनी सांगितले.

पारनेर कारखाना विक्री संदर्भात आर्थिक व्यवहार प्रकरणी त्यांना चौकशीसाठी नोटीस बनवली आहे. त्यांनी आजारी असल्याचे कारण दिले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होईल.

- सोमनाथ दिवटे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news