Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार; 60 एकर जमिनीचा धक्कादायक खुलासा

राहाता व सिन्नर भागात मोठ्या प्रमाणावर जमीन असल्याची माहिती समोर; दीपक लोंढे प्रकरणातही तपास सुरू
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Pudhari
Published on
Updated on

नगर: भोंदू अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार दिवसागणिक वाढतच आहे. पोलिस चौकशीत एकेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भोंदू खरातची राहाता व सिन्नर तालुक्यात तब्बल 60 एकर जमीन असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat Case
Abhishek Kalmkar Case: माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट; न्यायालयाचे आदेश

भोंदू खरात नॉमिनी असलेली दीपक लोंढेची चार खाती समता पतसंस्थेत आढळून आली. मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय म्हणून दीपक लोंढेचा परिचय खरात प्रकरणात समोर आला. त्या प्रकरणात पोलिसांनी दीपक लोंढेला चौकशीसाठी बोलविले. शुक्रवारी उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती.

Ashok Kharat Case
Sangamner Illegal Garbage Dumping: संगमनेरमध्ये शांती घाट परिसरात कचरा व राडारोड्यामुळे नागरिक त्रस्त

दरम्यान, भोंदू खरातची काकडी विमानतळ परिसरात चार एकर तर शिर्डीत चार अशी आठ एकर जमीन निष्पन्न झाली आहे. त्या व्यतिरिक्त भोंदू खरातची राहाता व सिन्नर भागात आणखी 60 एकर जमीन असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट सूत्रांकडून करण्यात आला.

Ashok Kharat Case
Maharashtra Heatwave: सोनगाव-राहुरी-राहाता परिसरात उष्णतेची लाट तीव्र; तापमान 41 अंशांवर

पोलिसांनी मिळविलेल्या दस्तावेजानुसार ही माहिती पुढे आली. आता जमीन कोठे? याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान लोंढेची शनिवारीही चौकशी केली जाणार आहे. त्यात याबाबत स्पष्टता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Ashok Kharat Case
Fake Disability Certificate Scam: बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; दोन एजंट अटकेत

नववी पास पण शार्प

दीपक लोंढे हा केवळ नववी पास आहे. तरीही तो इंग्रजीत मेसेज करत होता. गुगलचा वापर करून तो मराठीचे इंग्रजीत ट्रान्सलेट करायचा. नववी पास असला तरी बड्या बड्याच्या संपर्कात असलेला लोंढे डोक्याने मात्र शार्प असल्याचे चौकशीत समोर आले. भोंदू खरात हाही दहावी नापास असल्याची माहिती समोर आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news