Municipal Election Code Of Conduct: महापालिका निवडणूक; प्रचारासाठी 48 तास आधी परवानगी बंधनकारक

आचारसंहिता उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल; उमेदवार व पक्षांना निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा
Municipal Election Code Of Conduct
Municipal Election Code Of ConductPudhari
Published on
Updated on

नगर: महापालिका निवडणूक आचारसंहिता काळात प्रचारसभा, प्रचार रॅली यासाठी किमान 48 तास अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य, सोशल मीडियावर प्रचारासाठी वापरला जाणारा मजकूर आदींचीही पूर्वपरवानगी आवश्यक आहे. उमेदवारासह सूचक व अनुमोदकाचेही ना देय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे, उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

Municipal Election Code Of Conduct
Kedgaon BJP Municipal Election: केडगावात भाजप निष्ठावंत आक्रमक; कोतकर उमेदवारीला विरोध

निवडणूक कार्यक्रम, आचारसंहिता, निवडणूक अधिकारी, प्रशासनाकडून उपलब्ध सुविधा, उमेदवारी अर्ज, विविध प्रकारचे परवाने याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आदींची माहिती देण्यासाठी शहरातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक महापालिकेत झाली. आयुक्त डांगे यांच्यासह उपजिल्हाधिकारी सायली सोळंके आणि सर्व निवडणूक अधिकारी, आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखांनी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.

Municipal Election Code Of Conduct
Nashik Pune High Speed Rail Project: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे 2019 च्याच मार्गावर करा: विखे पाटील

पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले, की जातीय व धार्मिक समीकरण बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी. जात, धर्म भावना दुखावल्याचे निदर्शनास आल्यास कलम 299नुसार संबंधीताविरुद्ध गुन्हा दाखल होईल. ज्यांच्याविरुद्ध मागील निवडणूक कालावधीत गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, मागील 20 वर्षांत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Municipal Election Code Of Conduct
Karjat Ambalika Sugar: अंबालिका शुगरकडून शेतकऱ्यांना तत्काळ पेमेंट

निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना...

  • उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक

  • नॉन क्रिमीलेयरची गरज नाही.

  • राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म 30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत दाखल करावे लागतील.

  • निवडणूक खर्चाचा तपशील रोजच्या रोज देणे बंधनकारक.

Municipal Election Code Of Conduct
Chichondi Patil Police Raid: चिचोंडी पाटीलमध्ये कथित पोलिस छापा फज्जा
  • प्रचारसाठीचे वाहन वापर, सभा, रॅली, पोष्टर छपाई, बॅनर, प्रचार कार्यालय आदींना प्रमाणीकरणासह परवानगी आवश्यक.

  • सोशल मीडिया, व्हॉटसॲपवरील मजकूर/माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी समितीकडून प्रमाणीकरण करून घ्यावे. त्यासाठी झालेल्या खर्चाचा निवडणूक खर्चात समावेश होईल.

  • परवानगी न घेता व आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.

  • निवडणुकीचा जाहीर प्रचार 13 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत करता येणार.

  • मतमोजणी राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोडाऊन क्रमांक 6 व 7 येथे होणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news