Mula Dam Water Storage: मुळा धरणातील पाच टीएमसी पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी राखीव

जिल्ह्यात भूजलपातळी तीन मीटरने घसरली; आपत्कालीन परिस्थितीसाठी दीड टीएमसीचा बफरस्टॉक, पाणीटंचाईची चिंता
Mula Dam
Mula DamPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: दुष्‍काळी परिस्‍थितीमुळे धरणांतील पाणी ऑगस्‍ट २०२७ पर्यंत पिण्‍यासाठी राखीव ठेवण्‍याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्‍यानुसार मुळा धरणातील पाच टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्‍यात आला आहे. यामध्‍ये दीड टीएमसी बफरस्‍टॉकचा समावेश आहे. या धरणातून अहिल्‍यानगर शहर, राहुरी शहर, राहुरी विद्यापीठ व सोनईसह काही गावांना २२ पाणीयोजनांव्‍दारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Mula Dam
Shrirampur Water Shortage: श्रीरामपुरात दिवसाआड पाणीपुरवठा! दुष्काळामुळे पाणी कपात; ..तर नळ जोडणी खंडित!

मुळा, भंडारदरा, निळवंडे आदी धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे व आढळा ही तिन्ही धरणे ओव्‍हर-फ्‍लो झाली. मुळा धरण यंदा ९५ टक्‍के भरले. मात्र, या धरणांच्‍या लाभक्षेत्रासह जिल्‍हाभरात पावसाने पाठ फिरवली. बहुतांश महसूल मंडळांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. त्‍यामुळे जिल्‍हाभरातील भूजलपातळी जवळपास तीन मीटरने खालावली आहे.

Mula Dam
Ahilyanagar Navratri Festival: अहिल्यानगरमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह; मोहटादेवी आणि तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी

गोदावरी, प्रवरा व मुळा नदीकाठांवरील विहिरी वगळल्‍या तर उर्वरित जिल्‍हाभरातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. जानेवारी -फेब्रुवारी महिन्‍यांत विहिरी कोरड्याठाक दिसण्याची भीती आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होऊन गावागावांत पाणीटंचाईचा प्रश्‍न जटील होण्याचीही भीती आहे. प्रसंगी टँकर भरण्‍यासाठीही पाण्‍याचे स्‍त्रोत मिळणे मुश्‍कील होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Mula Dam
Rahuri District Bank Election: आता थांबणार नाही! राहुरीतून सत्यजित कदम ठाम; तनपुरेंची कोंडी

त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून शासनाने धरणांतील उपलब्‍ध पाणी प्राधान्‍याने पिण्‍यासाठी राखीव ठेवण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार मुळा धरणाचे साडेतीन टीएमसी पाणी ऑगस्‍ट २०२७ पर्यंत पिण्‍यासाठी राखीव ठेवले. याशिवाय आपत्‍कालीन परिस्‍थितीत वापर करता यावा यासाठी आणखी दीड टीएमसी पाण्‍याचा बफरस्‍टॉक करण्‍यात आल्‍याचे मुळा पाटबंधारे विभागाच्‍या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

Mula Dam
Ahilyanagar Drought: नगर तालुक्यात दुष्काळाचे सावट; १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा, दिवाळीही चिंतेत!

मुळा धरणाचा पाणीसाठा ६९ टक्‍के

मुळा धरण यंदा ९५ टक्‍के भरले होते. खरीप पिके पावसाअभावी वाया जाण्‍याच्‍या भीतीमुळे जवळपास पाच टीएमसी पाणी खरीप पिकांसाठी सोडण्‍यात आले होते. शुक्रवारी (दि.१६) सकाळी ६ वाजता या धरणाचा पाणीसाठा ६९.२४ टक्‍के म्‍हणजे १८ हजार २ दशलक्ष घनफूट इतका नोंदविला गेला आहे. या धरणाचा मृत साठा साडेचार टीएमसी इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news