Shrirampur Water Shortage: श्रीरामपुरात दिवसाआड पाणीपुरवठा! दुष्काळामुळे पाणी कपात; ..तर नळ जोडणी खंडित!

कमी पावसामुळे पाणीसाठा घटला; पाणी जपून वापरण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
Shrirampur Water Shortage
Shrirampur Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: चालू वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्रोतांमध्ये चिंताजनक जलसाठा उरला आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरात कठोर पाणी कपात आणि निबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करणार, त्यानंतरही नागरिकांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास नळ जोडणी खंडित करण्याचा कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिला.

Shrirampur Water Shortage
Pune University Protest Ban: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चांना यापुढे बंदी!

​श्रीरामपूरात पाणी कपात करण्याच्या निर्णयाबाबत पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष ससाणे यांनी माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी मनोज उकिरडे, पाणी पुरवठा विभागाचे सभापती योगेश जाधव उपस्थित होते.

प्रसंगी दोन दिवसाआड पाणी!

नगराध्यक्ष ससाणे यांनी शहरवासीयांना पाणी बचतीचे आवाहन करत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दररोजच्या पाणीपुरवठ्याऐवजी आता परिस्थितीनुसार एक दिवसाआड किंवा दोन दिवसांआड पाणी सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. ​नळाच्या पाण्याने वाहने धुणे, ​रस्त्यावर अथवा अंगणात सडा मारणे. ​बागकाम/लॉनसाठी पाईपने पाणी वापरणे, ​खाजगी बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे या बाबी दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Shrirampur Water Shortage
Baramati Water Supply News: बारामतीत रविवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा; निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याचा परिणाम

शहरातील बोअरवेल्सवर टायमर कंट्रोल

​ शहरातील ६८ बोअरवेलचे पंप अतिरिक्त वेळ चालू राहून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तेथे 'ऑटोमॅटिक टायमर कंट्रोल' बसवण्याचा निर्णय नगरपरिषदेच्या स्थायी समितीने १४ ऑक्टोबर २०२६ च्या बैठकीत घेतला आहे. तसेच शहरातील अनधिकृत नळ जोडण्या व पाण्याची चोरी रोखण्यासाठी लवकरच विशेष शोध मोहीम राबवली जाणार आहे.

खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचा मानस

​दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील १० विविध भागांतील खाजगी व सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल टँकर भरण्यासाठी निश्चित केल्या आहेत. तसेच, गरज भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने खाजगी विहिरींचे अधिग्रहणही केले जाईल. शहरावर ओढवलेल्या या दुष्काळी संकटात नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, असे आवाहन करण्यात आले.

पाण्याचा अपव्यय दिसल्यास कारवाई

​महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम, १९६५ च्या कलम २१६ नुसार पाण्याचा अपव्यय करणे हा दंडनीय अपराध आहे. भरारी पथकामार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल व आवश्यकतेनुसार नळ जोडणी खंडित केली जाईल. पाहिल्यावेळेस आढळल्यास १५० रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास ३०० रुपये दंड, तिसऱ्यांदा तसेच वारंवार आढळल्यास नळजोडणी कायमस्वरूपी खंडीत करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news