MPKV Rahuri GST controversy: राहुरी कृषी विद्यापीठात जीएसटी रद्द ठेकेदाराच्या देयकांवरून खळबळ

बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; कुलगुरूंनी चौकशी करावी अशी मागणी
MPKV Rahuri
MPKV RahuriPudhari
Published on
Updated on

नगर: राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ठेकेदाराचा जीएसटी नंबर 2023 पासून रद्द झालेला असतानाही संबंधित ठेकेदाराची देयके पारित करण्यासाठी विद्यापीठ अभियंता कार्यालयाकडून हालचाली सुरू असल्याची तक्रार नियंत्रक कार्यालयाकडे दाखल झाली आहे. या तक्रारीने विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

MPKV Rahuri
Pathardi Police Attack Case: पाथर्डी तालुक्यात पोलिस पथकावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

ठेकेदाराचा जीएसटी नंबर शासनाने रद्द केलेला असतानाही त्याच नंबरचा वापर करून कामे व देयके सादर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाचा कर व महसूल बुडविण्याच्या उद्देशाने हा प्रकार झाला असावा, अशी शंका तक्रारदाराने व्यक्त केली आहे. ही बाब गंभीर असून, त्यातून शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

MPKV Rahuri
Susare Gramsevak Absence Complaint: सुसरे ग्रामसेवक महिनाभर गैरहजर? ग्रामस्थांचा पंचायत समितीत धडक मोर्चा

जीएसटी नंबर रद्द असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतरही संबंधित ठेकेदाराची देयके नियंत्रक कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच काय तर एका दिवसात देयकांची नस्ती नियंत्रक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याने ‌‘नेमके कोणाच्या दबावाखाली किंवा मार्गदर्शनाखाली ही घाई?‌’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.यापूर्वी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीतून वगळण्यासाठी अभियंता कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अभियंता कार्यालय त्या ठेकेदारावर विशेष मेहेरबान असल्याचा आरोप होत आहे.

MPKV Rahuri
Ahilyanagar MIDC Crime Crackdown: एमआयडीसीतील गुन्हेगारांवर ‘ऑपरेशन’चा इशारा; पोलिस अधीक्षक घार्गे यांची झिरो टॉलरन्स भूमिका

जीएसटी नंबर रद्द असल्याची स्पष्ट नोंद असतानाही देयके पारित करण्यामागचे ‌‘गौडबंगाल‌’ काय, याची जोरदार चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे. संबंधित ठेकेदाराच्या देयकातून शासकीय कर व दंडाची रक्कम कपात करून शासनाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

MPKV Rahuri
Ahilyanagar District Bank Headquarters Renovation: अहिल्यानगर जिल्हा बँकेचे नूतनीकरण; अत्याधुनिक ई-लॉबीचे लोकार्पण

कुलगुरू साहेब, लक्ष घाला!

बांधकाम विभागाच्या अनेक तक्रारी दाखल होतात. शासकीय महसूल, कर अदा न करताही ठेकेदारांना देयके अदा होत असल्यास संबंधित ठेकेदाराच्या सादर कागदपत्रांची पडताळणी नव्याने कारभार हाती घेतलेले कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी करावी. या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पारदर्शक चौकशी करावी व बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news