

संगमनेर: संगमनेर तालुक्याची बाजारपेठ जिल्ह्यात मोठी आहे. प्रामाणिकपणा हे आपल्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य राहिले आहे. शहर व तालुक्याच्या विकासात व्यापार्यांचे योगदान आहे. एखादा चुकत असेल तर सांगा. मात्र गुणवत्तेच्या नावाखाली त्रास देणे ही आपली संस्कृती नसून व्यापार्यांना कुणीही त्रास देऊ नका, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
इंदिरानगर येथील निवासस्थानी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांना शहर मधील व्यापार्यांनी विविध अडचणींबाबत निवेदन दिले. (Latest Ahilyanagar News)
यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शहराच्या व तालुक्याच्या विकासात व्यापारी बांधवांनी योगदान दिले आहे. मागील काही काळापासून क्वालिटीच्या नावाखाली काही मंडळी व्यापार्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. जे प्रामाणिक काम करत असतील, त्यांना चुकीच्या मार्गाने त्रास देणे, अडचणीत आणणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यापार्यांनी त्यांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार सत्यजित तांबे यांना दिले. संगमनेर शहरातील गुळ पॅकिंग व अन्य व्यावसायिकांच्या विषयी काही लोक अपप्रचार करून संगमनेरमधील व्यापार्यांची बदनामी करत आहेत.
या गुळाचे नमुने हे अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर यांच्याकडून तपासणी करून घेतले असून हा गूळ प्रामाणिक झाल्याचे सिद्ध सुद्धा झाले आहे. मात्र तरीही काही लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यापार्यांना त्रास देत असल्याने समस्त व्यापार्यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेतली.
तर यावेळी जमलेल्या विविध व्यापार्यांनी संगमनेर शहरांमध्ये सध्या असलेल्या अशांतता आणि असुरक्षित याबाबत चिंता व्यक्त केली. यापूर्वी असे वातावरण कधीही नव्हते अशी बोलकी प्रतिक्रिया अनेक व्यापार्यांनी यावेळी व्यक्त केली.
ठराविक काही लोक मुद्दाम व्यापार्यांना अडचणीत आणण्यासाठी खोटेनाटे कागदपत्र करून ब्लॅकमेल करत आहेत. याविरुद्ध सर्वांनी आमदार सत्यजित तांबे व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. आमदार तांबे यांनी याबाबत व्यापार्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वस्त केले.
- राजेश मालपाणी, प्रसिद्ध उद्योगपती