Minor Girl Assault Ahilyanagar: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी खासगी क्लासेसच्या शिक्षकाला 20 वर्षे सक्तमजुरी

विशेष न्यायालयाचा निकाल; अनैसर्गिक कृत्यांसह विविध कलमान्वये शिक्षा व दंडाची तरतूद
Minor Girls Sexual Assault Case
अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षे कारावासpudhari photo
Published on
Updated on

नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकास दोषी धरत 20 वर्षे सक्त मजुरी व 13 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Minor Girls Sexual Assault Case
Sangamner Clerk Bribe Case: चहाच्या टपरीवर 13 हजारांची लाच घेताना संगमनेर तहसीलचा लिपिक रंगेहात अटकेत

विशाल लक्ष्मण बारगळ (वय 28, रा.बोल्हेगाव,अहिल्यानगर, मूळ रा.रस्तापूर,नेवासा) असे खासगी क्लासेसच्या शिक्षकाचे नाव आहे.

Minor Girls Sexual Assault Case
Nagar Municipal Corporation: नगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; भाजप-राष्ट्रवादी युतीकडून नव्या चेहऱ्यांना संधी

अधिक माहिती अशी, 18 ऑगस्ट 2018 रोजीचे सकाळी पीडित मुलगी (वय 14) ही आरोपीच्या खासगी स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये शिकवणीसाठी गेली असता, आरोपीने पीडितेशी बळजबरीने शरीर संबंध व अनैसर्गिक शारीरिक संबंध केला. याबाबतचा तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.

Minor Girls Sexual Assault Case
Shrirampur Municipal Council: करवाढ न करता श्रीरामपूर नगरपालिकेचा 192 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर; पाणीपट्टी वाढीस नकार

अल्पवयीन पीडित मुलगी, पालक, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्यधरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांनी विविध कलमान्वये वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनंत चौधरी व कोमल राठोड यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news