Nagar Municipal Corporation: नगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; भाजप-राष्ट्रवादी युतीकडून नव्या चेहऱ्यांना संधी

महापौर ज्योती गाडे यांनी निवडी जाहीर केल्या; शिवसेनेचा अर्ज त्रुटीमुळे रद्द, एक जागा रिक्त
Nagar Municipal Corporation
Nagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

नगर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडी महापौर ज्योती गाडे यांनी जाहीर केल्या. राष्ट्रवादीकडून पराभूत बाबासाहेब नागरगोजे, भाजपकडून माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांना पुन्हा संधी देण्यात आली. विकास जगताप, रेवननाथ पवार, विशाल नाकाडे या नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना भाजप-राष्ट्रवादी युतीने स्वीकृतची संधी दिली. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदाचे उमेदवार आदेश सुरेश जाधव यांचा अर्ज त्रुटीमुळे छाननीमध्ये रद्द करण्यात आला.

Nagar Municipal Corporation
Shrirampur Municipal Council: करवाढ न करता श्रीरामपूर नगरपालिकेचा 192 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर; पाणीपट्टी वाढीस नकार

महापालिकेच्या राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात गुरूवारी सकाळी स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानंतर लगेच 12 वाजता स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीसाठी दुसरी सभा घेण्यात आली. राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे, भाजपचे गटनेते शारदा ढवण, शिवसेनेचे गट नेते दत्तात्रय कावरे यांनी बंद पाकिटामध्ये इच्छुकांची नावे असलेले अर्ज सादर केले. अर्जाच्या छाननीसाठी अर्धातासांचा अवधी घेण्यात आला. अर्जाच्या छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास जगताप, बाबासाहेब नागरगोजे, रेवणनाथ पवार,

Nagar Municipal Corporation
Kopargaon Municipal Council: कोपरगाव पालिकेचा 2026-27 अंदाजपत्रकाला मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते व शास्तीकर माफीबाबत महत्त्वाचे संकेत

भाजपाचे रवींद्र बारस्कर व विशाल नाकाडे यांचे अर्ज वैध ठरले. त्यानुसार महापौर ज्योती गाडे यांनी त्यांच्या निवडी जाहीर केल्या. शिवसेनेकडून आदेश जाधव यांचे नाव सूचविण्यात आले होते. मात्र, त्यांच्या अर्जासमवेत अपत्य व मालमत्तेबाबत शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. शिवसेनेच्या कोट्यातील ही जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. भविष्यात स्वीकृत सदस्य निवडीसाठी होणाऱ्या सभेत त्यांना अर्ज दाखल करता येईल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

Nagar Municipal Corporation
Shrigonda Municipal Council: श्रीगोंदा नगरपरिषदेचा 221 कोटींचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प मंजूर; शिवस्मारक, तीर्थक्षेत्र विकास व पायाभूत सुविधांना मोठी चालना

स्वीकृत सदस्य पदासाठी नागरगोजे बाबासाहेब संतोष (संत वामनभाऊ, भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान), जगताप विकास दादासाहेब (युवा शक्ती प्रतिष्ठान), रेवन्नाथ दगडू पवार (उपनगर बुद्धिबळ सेवा संस्था), विशाल नाकाडे (श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान), रवींद्र बारस्कर (विचारधन चेस अकॅडमी अँड स्पोर्ट क्लब), आदेश सुरेश जाधव (नंदनवन सार्वजनिक वाचनालय) यांना सामाजिक संस्थेचा अनुभव असल्याने त्यांची नावे सूचवण्यात आले होते. यातील आदेश जाधव वगळता सर्वांची निवड करण्यात आली.

Nagar Municipal Corporation
Nilesh Lanke School Visit: खासदार नीलेश लंके यांची आढळगाव प्राथमिक शाळेला भेट; विद्यार्थ्यांचा घेतला अभ्यास

संख्या बळानुसार स्वीकृत सदस्याच्या निवडीसाठी सहापैकी पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून स्वीकृत सदस्य म्हणून सादर झालेला अर्ज अपत्य व मालमत्तेबाबतचे शपथपत्र न जोडल्याने रद्द करण्यात आला. शिवसेनेच्या कोट्यातील जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. भविष्यात स्वीकृत सदस्य निवडीसाठी सभा होईल त्यावेळी पुन्हा निवड करण्यात येईल.

यशवंत डांगे, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news