Sangamner Clerk Bribe Case: चहाच्या टपरीवर 13 हजारांची लाच घेताना संगमनेर तहसीलचा लिपिक रंगेहात अटकेत

अहिल्यानगर एसीबीची सापळा कारवाई; महसूल विभागातील आठवड्यातील दुसरी मोठी धडक
Bribery Case
Bribery Case Pudhari
Published on
Updated on

संगमनेर : संगमनेर तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.26) रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेल्या या दुसऱ्या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Bribery Case
Nagar Municipal Corporation: नगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; भाजप-राष्ट्रवादी युतीकडून नव्या चेहऱ्यांना संधी

तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी 13 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडेनी काम करण्यास नकार दिला. काम करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली. अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Bribery Case
Shrirampur Municipal Council: करवाढ न करता श्रीरामपूर नगरपालिकेचा 192 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर; पाणीपट्टी वाढीस नकार

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. तहसील कार्यालयातील अर्धन्यायिक सुनावणीचे काम आटोपून बाहेर आलेल्या लिपिक खाडे याने चहाच्या टपरीवर तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. पैसे मोजत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या.

Bribery Case
Kopargaon Municipal Council: कोपरगाव पालिकेचा 2026-27 अंदाजपत्रकाला मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते व शास्तीकर माफीबाबत महत्त्वाचे संकेत

संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वीच एका तलाठ्यावरही कारवाई झाली होती. गुरुवारी केलेल्या कारवाईत पोलिस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक छाया देवरे आदींनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news