Ahilyanagar Malunja Mahegaon Bandhara Repair: मालुंजा–माहेगाव बंधारा धोकादायक अवस्थेत; दुरुस्तीची तातडीची मागणी

प्रवरा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था गंभीर; पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Ahilyanagar Malunja Mahegaon Bandhara
Malunja Mahegaon BandharaPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील मालुंजा - माहेगाव बंधारा (केटी वेअर) सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वडाळा पाटबंधारे विभागामार्फत कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर पाटबंधारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Ahilyanagar Malunja Mahegaon Bandhara
Maharashtra Farmer Crisis: नेवाशात शेतकरी दुहेरी संकटात; भाव नाही, मजुरी मात्र वाढली

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंधाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून विविध तांत्रिक समस्या गंभीर बनल्या आहेत. पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याच्या उत्तर व पूर्व बाजूचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे कडेला मोठे खड्डे पडून बांधकाम उघडे पडले आहे. तसेच बंधाऱ्याच्या मध्यभागी असलेले संरक्षक लोखंडी पाईप पूर्णपणे गायब झाले असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दक्षिण व पश्चिम बाजूसही परिस्थिती चिंताजनक आहे.

Ahilyanagar Malunja Mahegaon Bandhara
Animal Husbandry KCC scheme: अहिल्यानगरमध्ये पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना; 3 लाखांपर्यंत कर्ज

पुराच्या पाण्यामुळे बंधारा आणि नदीकाठ यांच्यामध्ये ‌‘व्ही‌’ आकाराची खोल दरी निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात भराव खचून वाहून गेला आहे. परिणामी, या भागात लांब-रुंदीचे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Ahilyanagar Malunja Mahegaon Bandhara
Karjat Sewing Machine Scam: कर्जतमध्ये शिलाई मशिन घोटाळा; 439 महिलांची 4.82 लाखांची फसवणूक

दरम्यान, अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी होत असतानाही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. येत्या जून 2026 च्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Ahilyanagar Malunja Mahegaon Bandhara
Nevasa Firing Case: नेवाशात गोळीबार प्रकरण; मुख्याधिकाऱ्यांची तक्रार, आज सर्वपक्षीय मोर्चा

अन्यथा आंदोलनाचा इशारा

बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास बाळासाहेब बडाख, श्रीकृष्ण बडाख, किशोर बडाख, अरुण बर्डे, बाळासाहेब बोरुडे व संदीप बडाख यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news