Maharashtra Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा 27 एप्रिलपासून बेमुदत बंद

खत पुरवठा, एचटीबीटी बियाणे व मार्जिनसाठी राज्यभर आंदोलन
Maharashtra Fertilizer Dealers Strike
Maharashtra Fertilizer Dealers StrikePudhari
Published on
Updated on

नगर: कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होत असलेले लिंकिंग बंद व्हावे, शेजारील राज्यांतून येणारे अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाणे प्रतिबंधित व्हावे आदी विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे 27 एप्रिलपासून बेमुदत विक्री बंद आंदोलन सुरु होणार आहे.

Maharashtra Fertilizer Dealers Strike
Ahilyanagar Cleanliness Fine Drive: अहिल्यानगरमध्ये स्वच्छता नियमभंगावर कारवाई; दंड मोहीम तीव्र

याबाबत महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड सीडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. संगमनेर येथील काही पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांना निवेदन दिले आहे.

Maharashtra Fertilizer Dealers Strike
Sangamner Gadge Case: संगमनेरचा भोंदू गडगे गडगंज; कोट्यवधींची मालमत्ता उघड

विविध अडचणीबाबत कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या माफदा संघटनेकडून कृषी मंत्री, प्रधान सचिव, कृषी आयुक्त तसेच कृषी संचालक आदींकडे गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, कृषी विभागाकडून विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.

Maharashtra Fertilizer Dealers Strike
Jamkhed Mohari Dam Repair Tender: मोहरी तलाव दुरुस्तीला गती; 3.02 कोटींची निविदा जाहीर

त्यामुळे नाईलाजस्तव 27 एप्रिलपासून निविष्ठा विक्रेते विक्री बंद आंदोलन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आयकर वा जीएसटी कायद्यानुसार सर्व खर्च वजा जाऊन नफा देणे या पध्दतीने किंवा 88 टक्के दराने रासायनिक खतांचे विक्री मार्जिन मिळावे, रासायनिक खतांच्या वितरण नियमानुसार सर्व खतांचा पुरवठा विक्रेत्यांच्या विक्री केंद्रपर्यंत देणे बंधनकारक करावे,

Maharashtra Fertilizer Dealers Strike
Ahilyanagar Police Cattle Rescue: राहुरी-राशिनमध्ये 11 गोवंशीयांची सुटका; पोलिसांची मोठी कारवाई

प्रमाणित बियाणासंबंधी साथी पोर्टलचा वापराची विक्रेत्यांवर सक्ती न करता साथी पोर्टल बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपनी स्तरापर्यत राबविण्यात यावी आदींसह मागण्या महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड सीडस डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपीन कासलीवाल यांनी मांडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news