Kanifnath Madhi Yatra: रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला मढीत कानिफनाथ समाधी दर्शनासाठी लाखो नाथभक्तांची गर्दी

नाथ संप्रदायाच्या शक्तिपीठात भक्तिमय वातावरण; यात्रेनिमित्त विविध धार्मिक परंपरांना सुरुवात
Kanifnath Madhi Yatra
Kanifnath Madhi YatraPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला मढी येथे कानिफनाथांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी नाथभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. नाथ संप्रदायाचे शक्तिपीठ असलेल्या मढी येथे शनिवारी लाखो नाथभक्त दाखल झाले असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. रंगपंचमीला पारंपरिक पद्धतीने कानिफनाथांचा समाधी सोहळा साजरा केला जातो. त्या सोहळ्याच्या पर्वणीसाठी राज्यभरातून भाविक मढीत दाखल झाले आहेत.

Kanifnath Madhi Yatra
Rahuri Bypoll Politics: राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या भाजप प्रवेश चर्चेने खळबळ

यात्रेनिमित्त मढीत विविध दुकाने, स्टॉल, राहट पाळणे, मनोरंजनाचे खेळ आणि अन्य आकर्षणांची रेलचेल दिसून येत आहे. मढीची गादी राजयोगी गादी म्हणून प्रसिद्ध असून प्रत्येक भक्तांच्या हाकेला पावणारी अशी नाथभक्तांची भावना आहे. यात्रेसाठी आलेले नाथभक्त शिंगी, शैली, कंथा, कमंडलू, मुद्रा, जानवे तसेच भगवे वस्त्र परिधान करून भक्तिभावाने समाधीचे दर्शन घेत आहेत.

Kanifnath Madhi Yatra
Pathardi Illegal Test Centers: पाथर्डीत 47 पैकी 35 रक्त-लघवी तपासणी केंद्रे बेकायदेशीर

कानिफनाथांच्या समाधीवरील पवित्र लेप तावीदामध्ये भरून घेऊन ते वर्षभर त्याची पूजा करतात. तसेच नाथभक्त देवकाठी (अस्थान्या) घेऊन यात्रेत सहभागी होतात. त्या देवकाठीवर त्रिशूल लावलेले असते आणि ती देवाच्या मंदिराच्या कळसाला स्पर्श करून अर्पण केली जाते.

Kanifnath Madhi Yatra
Ahilyanagar HPV Vaccination Drive: महिला दिनापासून शहरात HPV लसीकरण मोहीम; मुलींना कर्करोगापासून संरक्षण

या परंपरेला नाथ संप्रदायात विशेष महत्त्व आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गावात ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने वाहनांची कोंडी टाळण्यास मदत होत आहे.

Kanifnath Madhi Yatra
Savedi Tukaram Bij Celebration: सावेडीत संत तुकाराम बीजे उत्सवाची भक्तिमय दिंडी

आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ यात्रेच्या नियोजनात सक्रिय सहभागी झाले आहेत. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक तसेच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news