Savedi Tukaram Bij Celebration: सावेडीत संत तुकाराम बीजे उत्सवाची भक्तिमय दिंडी

टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनाम सप्ताह; गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले
Savedi Tukaram Bij Celebration
Tukaram Bij CelebrationPudhari
Published on
Updated on

नगर: सावेडी गावामध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्षांपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा सोहळा दरवर्षी मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात होत असून, यावर्षीही सावेडीगाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

Savedi Tukaram Bij Celebration
Pathardi Chichondi Clash: चिचोंडीतील शालेय कार्यक्रमानंतर दोन गट आमने-सामने

यानिमित्ताने सावेडी गावात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी सोहळ्यात टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. गावातील महिला-पुरुष, युवक-युवती तसेच लहान मुले मोठ्या उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडी मार्गावर गावातील महिलांनी ठिकठिकाणी सडा-रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले. रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलेले रस्ते आणि भक्तिरसात रंगलेले वारकरी हे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

Savedi Tukaram Bij Celebration
Maharashtra Budget Reactions: अर्थसंकल्पावर राजकीय प्रतिक्रिया; कुणाचे स्वागत तर कुणाची टीका

दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून गावामध्ये आध्यात्मिकतेचा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचे कार्य केले जाते. या मिरवणुकीत ज्येष्ठ महिला-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. काही ठिकाणी महिलांनी फुगडी खेळत भक्तीमय वातावरणात आनंद व्यक्त केला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि सरला वाकळे यांनीही दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत भक्तांसोबत नाचत उत्सवाचा आनंद घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news