Rahuri Bypoll Politics: राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या भाजप प्रवेश चर्चेने खळबळ

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध; अक्षय कर्डिले यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशारा
Rahuri Assembly Bypoll
Rahuri Assembly BypollPudhari
Published on
Updated on

राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजप नेत्यांची भेट घेतल्याने राहुरीत राजकीय तर्कविर्तकांना उधान आले आहे. दरम्यान तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शविला असून अक्षय कर्डिले यांना डावलल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Rahuri Assembly Bypoll
Pathardi Illegal Test Centers: पाथर्डीत 47 पैकी 35 रक्त-लघवी तपासणी केंद्रे बेकायदेशीर

प्राजक्त तनपुरे हे माजी मंत्री असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत शिवाजी कर्डिले आमदार झाले. शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी जाहीर झाली आहे. पुढील आठवड्यात राहुरी पोटनिवडणुकीचे संकेत दिले जात असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Rahuri Assembly Bypoll
Ahilyanagar HPV Vaccination Drive: महिला दिनापासून शहरात HPV लसीकरण मोहीम; मुलींना कर्करोगापासून संरक्षण

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाला आक्षेप घेत अक्षय शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीची मागणी केली. अक्षय कर्डिले यांना डावलले तर सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Rahuri Assembly Bypoll
Savedi Tukaram Bij Celebration: सावेडीत संत तुकाराम बीजे उत्सवाची भक्तिमय दिंडी

दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी त्यांचे वारसदार अक्षय यांनाच उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना डावलून अन्य कोणालाही उमेदवारी दिल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशारा देण्यात आला.

Rahuri Assembly Bypoll
Pathardi Chichondi Clash: चिचोंडीतील शालेय कार्यक्रमानंतर दोन गट आमने-सामने

दरम्यान, अक्षय कर्डिले यांच्याबाबत ट्रू कॉलरवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुरीच्या राजकारणात सन्मान आणि सामंजस्य जपले गेले आहे. मतभेद असले तरी वैयक्तिक स्तरावर अपमानास्पद भाष्य करणे ही राहुरीच्या राजकीय संस्कृतीला धरून नसल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news