Pimplas Leopard: दोन कुत्र्यांचा फडशा; बिबट्याचा भररस्त्यात अर्धा तास ठिय्या!

महाविद्यालयाच्या परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Leopard
LeopardPudhari
Published on
Updated on

एकरूखे: गेल्या तीन दिवसात दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्याने चक्क दिवसाढवळ्या भररस्त्यावर, वाहतुकीला न जुमानता अर्धा तास विसावा घेतला. पिंपळसचे माजी सरपंच भारत लोखंडे यांच्या वस्तीसमोर हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या द्राक्षबागेत दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाले. हा परिसर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज अर्थात विखे पाटील महाविद्यालयाजवळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातून ये-जा करणाऱ्यांना भल्या सकाळी एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन घडले आहे.

Leopard
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेतील पाच संचालकांना तिसऱ्यांदा संधी?

आज सायंकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या लोखंडे यांच्या वस्ती समोरील कालव्यांच्या भरावावर निवांतपणे बसलेला आढळला. त्यांच्या समोर पन्नास फुटांवर माणसांची वर्दळ सुरू होती. या भागातील रहिवासी शैलेश वैजापूरकर मोटारीतून रस्त्याने जात असताना त्यांना पन्नास फुटांवर बसलेला बिबट्या दिसला. त्यांनी निवांतपणे त्याचे फोटोसेशन केले. लोखंडे वस्तीवर मोबाईलद्वारे संपर्क साधून सर्वांना सावध केले. सुमारे अर्धातास हा बिबट्या शांतपणे बसून लोखंडे यांची वस्ती न्याहाळीत होता. त्याच्या जवळ गाडी नेल्यानंतर रस्त्यावरून तो निवांतपणे शेतात शिरला.

Leopard
Vikramsinh Pachpute BJP: विक्रमसिंह पाचपुते ठरणार भाजपचा ‘जेन झी’ चेहरा?

माजी सरपंच लोखंडे यांच्या बंगल्याच्या उंच कुंपणावरून उडी मारून बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याला उचलून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यापाठोपाठ आज पहाटे चुळभरे वस्तीवरील आणखी एक कुत्रे नेले. मागील आठवड्यात लोखंडे यांच्या द्राक्षबागेशेजारून पिंपळसकडे क्राॅक्रीटच्या रस्त्यावर भल्या सकाळी दोन बिबट्यांचे दर्शन घडले. हा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडे जाण्याचा महत्त्वाचा रस्ता आहे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या तिनही रस्त्यांवर बिबट्यांचा दिवसाउजेडी वावर सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leopard
School Food Safety Training: आता शाळांना ‘फसाई’ नोंदणी बंधनकारक; तुकाराम मुंडेंचा पोषण आहारावर वॉच

या भागात सर्वत्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आणि भल्या सकाळी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा वावर असतो. त्यामुळे सर्वत्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने दोन-तीन ठिकाणी पिंजरे लावून हे बिबटे पकडणे गरजेचे आहे.

भारत लोखंडे, माजी सरपंच, पिंपळस

logo
Pudhari News
pudhari.news