Kukadi Canal: कुकडी डाव्या कालव्याचे रब्बी आवर्तन सुरू; ५०० क्युसेकने पाणी सोडले

कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार.
Kukadi Canal
Kukadi CanalPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: कुकडी डाव्या कालव्याच्या रब्बी हंगामी पिकांसाठी गुरुवारी (दि.५) सायंकाळी ४ वाजता प्रत्यक्ष आवर्तनास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला.

या आवर्तनामुळे कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारामुळे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Kukadi Canal
Ahilyanagar District Bank: अहिल्यानगर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार? सुजय विखे, मोनिका राजळे यांच्या नावांची चर्चा

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सभापती राम शिंदे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ज्वारी, गहू, हरभरा तसेच इतर रब्बी पिकांच्या पेरणीपासून ते पिकांच्या वाढीच्या अवस्थेपर्यंत पाण्याची आवश्यकता असते.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांसाठी कालव्याचे आवर्तन वेळेत सुरू होणे ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्यांतील अनेक गावांमधील शेती कुकडी डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Kukadi Canal
Ahilyanagar Sugar Mills: ऊस दराची कोंडी फोडा पालकमंत्री विखे पाटील यांचे कारखान्यांंना निर्देश; ९ नोव्हेंबरपर्यंत घ्या सकारात्मक निर्णय

त्यामुळे या आवर्तनाचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होणार आहे. पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी पिकांच्या सिंचनाचे नियोजन करणे शक्य होणार असून, शेतीच्या उत्पादनाला आधार मिळणार आहे.

शेवटच्‍या टोकापर्यंत पाण्‍याची अपेक्षा

कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना नियोजनानुसार आणि समान पद्धतीने पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, दुष्‍काळातही आवर्तनाचा मोठा दिलासा शेतकर्‍यांना मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.