

नगर: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी कोणाची निवड होणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. गुरुवार दि. गुरुवार दि. 12 नोव्हेंबर 2026 रोजी नूतन संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली असून, यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, संख्याबळाच्या आधारे भाजपाचा अध्यक्ष पदावर दावा असणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला संधी देणार? याकडे लक्ष असणार आहे.
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील सहकार विकास आघाडीने 18 जागा मिळवत सत्ता मिळवली.
या सर्व प्रक्रियेत डॉ. सुजय विखे पाटील यांची निर्णायक भूमिका राहिली. तर विरोधी गटातून खा. नीलेश लंके यांच्या परिवर्तन मंडळाला त्यांचीच एक जागा आणि विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे दोन संचालक असे संख्याबळ आहे.
दरम्यान, सहकार विकास आघाडीची बँकेत सत्ता आली आहे. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्षाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागलेले आहे. आता दिवाळीच्या धामधुमीतच गुरुवारी दि. 11 रोजी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे.
सकाळी 11 ते 11.30 उमेदवारी अर्ज स्वीकारणे, दुपारी 12 पर्यंत छाननी, 12.30 पर्यंत माघार, दुपारी 12.30 ते 1.30 मतदान प्रक्रिया, दुपारी 1.30 ते 2 मतमोजणी आणि त्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला वरिष्ठ नेत्यांकडूनही ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे. मात्र, मोनीका राजळे, बिपीन कोल्हे यांचीही नावे एका गटाकडून चर्चेत आणली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे.