Koyta Gang: हप्ता द्या, अन्यथा दुकान जाळून टाकू! संगमनेरातही कोयता गँगची दहशत

दागिने, रोकड लुटून गुंड पसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा; तिघे जेरबंद
sangamner News
संगमनेरातही कोयता गँगची दहशत Pudhari
Published on
Updated on

संगमनेरः ‘आम्हाला हप्ता सुरु करा, अन्यथा, दुकानाची तोडफोड करुन जाळू,’ अशी धमकी देत, दुकान मालकासह व्यवस्थापकाला जबर मारहाण करण्यात आली. हातातील कोयता हवेत फिरून, दहशत निर्माण करीत रोकड व सोन्याचे दागिने लुटून आठ गुंडांनी सिनेस्टाईल दहशत निर्माण केली. दरम्यान, जाता-जाता गुंडांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना संगमनेर शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. (Latest Ahilyanagar News)

शिरीष अनंत शहाणे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिरीष शहाणे यांचे श्रीरामनगर येथे मोटार रिपेरींग व स्पेअर पार्टचे दुकान आहे. बाळासाहेब भुजबळ व्यवस्थापक आहेत. मंगळवारी (दि.9) रोजी रात्री ते दुकानात काम करीत होते. दुकानाशेजारी मोकळ्या इमारतीत दारु पिवून, 8 तरूण दुकानात शिरले. एकाच्या हातात कोयता होता. धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहकरे , दीपक वैराळ , संदीप वाल्हेकर ऊर्फ जब्या, निखील ऊर्फ अजय वाल्हेकर व अन्य दोघेजण असे आठ तरूण शिवीगाळ करीत दुकानात घुसले. भुजबळ यांना त्यांनी मारहाण केली.

sangamner News
Honey Trap Case: अकोल्यातही अनेकजण ‌‘हनी ट्रॅप‌’ची शिकार; ‘त्या‌’ तिघींचा कारनामा

धीरज पावडे याने कोयत्याचा धाक दाखवित शिरिष शहाणे यांना मारहाण केली. आम्हाला मारहाण करु नका,’ अशी विनवणी करीत, शेजार्‍यांना मदतीसाठी हाक दिली. त्या रागातून धिरज पावडे याने कोयता हवेत फिरवत ‘खबरदार कोणी पुढे याल तर, तोडून टाकील,’ अशी धमकी देत दहशत पसरविली. ‘आम्हाला हप्ता सुरु करायचा, आहे. हप्ता न दिल्यास दुकानाची तोडफोड करुन, दुकान जाळू,’ अशी धमकी दिली. दोघांनी काऊंटरची चावी हिसकावून घेत त्यातील रक्कम लुटली. धीरज पावडे याने शहाणे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची साखळी हिसकावली. जाता-जाता त्यांनी चैतन्यनगर येथे जिजामाता उद्यानच्या गेटलगत भाग्यश्री दिलीप गायकवाड यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. दीड लाख रुपयांचे सोनसाखळी, रोकड 1 हजार, एक लाखाचे मंगळसूत्र असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक इमरान खान करीत आहे.

sangamner News
Ahilyanagar Municipal Elections: नवा वार्ड, नवखे चेहरे, की तेच ते?

संगमनेरच्या वेशीत...

पुणे, मुंबईसारख्या महानगरात घडणारी कोयता गँगची दहशत आता थेट संगमनेरात पसरल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहर पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमनेरात वाढती दहशत व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोयता दाखवून गुंडांनी थेट हप्ता सुरू करण्याची मागणी केल्यामुळे संगमनेरसारख्या सुसंस्कृत शहरात गुन्हेगारी फोफावल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news