Kopergaon Rural Road Development: कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांसाठी 5.18 कोटींच्या निधीला मंजुरी

जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता; 23 गावांतील विकासकामांना गती
Road Development
Road DevelopmentPudhari
Published on
Updated on

कोळपेवाडी: कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 5.18 कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.

Road Development
Pohegaon Mayureshwar Ganpati: पोहेगाव येथे अंगारकी संकष्ट चतुर्थीला मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी

आ. काळे म्हणाले, कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या विकास कामांना सुरुवात होणार आहे.

Road Development
Pathardi Blue Throat Bird: पाथर्डीत दुर्मिळ पाहुणा; ‘ब्लू थ्रोट’ पक्ष्याची पहिल्यांदाच छायाचित्रासह नोंद

या प्रशासकीय मंजुरीच्या कामामध्ये कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे चारी नं. 5 कदम वस्ती ते भगुरे शेत रस्ता खडीकरण करणे, संवत्सर येथे सुनील कुहिले घर ते शरद शेटे घर रस्ता खडीकरण करणे, कोकमठाण येथे भाऊसाहेब रक्ताटे वस्ती ते जि.प. शाळा कांचनवाडी रस्ता करणे, खिर्डी गणेश येथे अहिल्यानगर-मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती शिवरस्ता खडीकरण करणे, खोपडी येथे भऊर रस्ता खडीकरण करणे, जेऊर कुंभारी येथे रस्ता डांबरीकरण करणे, जेऊर पाटोदा येथे जिजाऊ पार्क ते चंद्रलिला नगर रस्ता करणे, टाकळी येथे जि.प.शाळा ते बाबासाहेव देवकर घर रस्ता 7 चारी खडीकरण करणे, तळेगांव मळे येथे गावठाण ते भाऊसाहेव भवर वस्ती रस्ता करणे (बेलगाव रस्ता) खडीकरण करणे, दहीगांव बोलका येथे वीरभद्र मंदिर ते नानासाहेब निघोट ते विजय पराग वस्ती रस्ता खडीकरण करणे, धामोरी येथे विश्वास जाधव वस्ती ते सत्यगाव रस्ता डांबरीकारण करणे.

Road Development
Ahilyanagar Municipal Vice President Election: उपनगराध्यक्ष निवडीची रणधुमाळी; पाच नगरपालिकांच्या पहिल्या सभा निश्चित

विठ्ठलराव जगझाप वस्ती, नाटेगाव येथे गावठाण ते येसगाव रोड जयराम धोंडीबा मोरे घर रस्ता डांबरीकरण करणे, मढी बु येथे रा.मा. 7 ते ग्रा.मा. 30 रस्ता डांबरीकरण करणे, सांगवी भुसार येथे माणिक गयाजी शिंदे घर ते सांगवी भुसार गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. माळेगांव थडी येथे गोदावरी नदी ते मळेगाव थडी रस्ता डांबरीकारण करणे, करजी बु. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण करणे, ब्राम्हणगांव येथे संपतराव आसणे दुकान ते पांडुरंग आसणे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, वेळापूर येथे रामा 7 ते बिरोबा मंदिर (कारवाडी शिव) रस्त्यावर सी.डी.वर्क करणे, कोळगांव थडी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे. (शेड, शवदाहिनी इ., हिंगणी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे. (रोड, शवदाहिनी इ., राहाता तालुक्यातील जळगांव येथे विजय बबन चौधरी घर ते गोदावरी उजवा कालवा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, रामपुरवाडी येथे पाझर तलाव ते अण्णासाहेब देठे घर रस्ता खडीकरण करणे, शिंगवे येथे बारहाते गिरणी ते बाबासाहेब कवडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, या एकूण तेवीस गावांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Road Development
Ahilyanagar Municipal Election Cash Seizure: महापालिका निवडणुकीत पैशांचा खेळ उघड! दुचाकीच्या डिक्कीत सापडले एक लाख

कोपरगाव मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागातील रस्ते नव्याने विकसित होणार असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात त्याचा निश्चित फायदा होईल. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल. रस्त्यांशिवाय विकास अशक्य असून चांगले रस्ते हे प्रत्येक गावाच्या प्रगतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक गावासाठी चांगले रस्ते निर्माण करणे हे माझे ध्येय आहे. या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने ग्रामविकासाचा वेग आता अधिक वाढणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news