Kopargaon Municipal Election: कोपरगावच्या विकासासाठी पुरेसा निधी आणू – आमदार आशुतोष काळे

पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे द्या; नगराध्यक्ष-नगरसेवकांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन
Kopargaon Municipal 
Election
Kopargaon Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

कोळपेवाडी : सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेने मला दुसऱ्यांदा ऐतिहासिक मताधिक्याने निवडून दिली. मला दिलेली संधी हि मी केलेल्या विकास कामांवर, माझ्या प्रामाणिकपणावर आणि विकासाभिमुख दृष्टीकोनावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे.

Kopargaon Municipal 
Election
Climate Smart Sugarcane Farming: हवामान पूरक ऊसशेती ही काळाची गरज – डॉ. अँड्र्यू हटसन

या विश्वासाला तडा जाऊ न देता, कोपरगावच्या विकासासाठी माझी जबाबदारी यापुढेही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार आहे. कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी आवश्यक असेल, तो निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगावकरांना सर्वच प्रचाराच्या भडीमारातून दिलासा देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ बुधवार (दि.17) रोजी तहसील कार्यालयाच्या मैदानावर ‌‘महाराष्ट्राचा हास्यविनोद संगीत कार्यक्रम‌’ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

Kopargaon Municipal 
Election
Malpani Group Legacy Award: मालपाणी उद्योग समूहात ‘लिगसी’ पुरस्कार सोहळ्याची थाटात रंगत

आ. काळे म्हणाले, मी निवडून आल्यापासून कोट्यवधींचा निधी कोपरगावाच्या विकासकामांसाठी आणला आहे. पुढील काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी आणून विकासकामांना गती द्यायची आहे. नगरपालिकेतील सत्तेचा उपयोग जर विकासासाठी करायचा असेल, तर ती सत्ता राष्ट्रावादीची असणे अत्यंत आवश्यक आहे. कोपरगावच्या सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे म्हणाले की, काम करत आलोय आणि काम करत राहणार या विचाराने कला संस्कृतीला जोपासणारी आणि प्रोत्साहन देणारी कोपरगाव हि कलेची पंढरी आ.आशुतोष काळेंच्या नेतृत्वात विकसित होत आहे. विकासाचा रथ अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले.

Kopargaon Municipal 
Election
Kopargaon Traders Association: कोपरगाव व्यापारी महासंघाने काका कोयटे यांच्यापासून काढला पाठिंबा

दरम्यान, या कार्यक्रमात विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रसाद खांडेकर व ओंकार राऊत यांनी कोपरगावकरांना खळखळून हसवले. तसेच महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक रोहित राऊत व गायिका राधिका भिडे यांनी आपल्या जादुई आवाजाने कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे आदी उपस्थित होते.

Kopargaon Municipal 
Election
Urea Fertilizer Shortage: जामखेडमध्ये युरिया कागदावर मुबलक, शेतकऱ्यांना मात्र मिळेना!

कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवून आ. काळे यांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती बघून कोपरगावच्या सर्वच महिलांचे आशीर्वाद आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. काकासाहेब कोयटे व राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना कोपरगावचे सुज्ञ मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील.

अभिनेत्री गिरीजा ओक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news