Karjat Unseasonal Rain: मकरसंक्रांतीला कर्जतात अवकाळी पावसाची हजेरी

द्राक्ष व भाजीपाला पिकांना फटका, शेतकऱ्यांमध्ये चिंता
Karjat Unseasonal Rain
Karjat Unseasonal RainPudhari
Published on
Updated on

कर्जत: शहरात मंगळवारी रात्री आणि बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात झालेल्या या जोरदार पावसाने शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि चौकात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मकरसंक्रांतीला पाऊस पडल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Karjat Unseasonal Rain
Anandi Bazar ZP School: आढळगाव जि.प. शाळेच्या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांची उद्योजकतेची झलक

मंगळवारी संध्याकाळनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि रात्री 10 नंतर अचानक काही वेळेतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागरिक, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांना नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आंब्याचा मोहर या पावसामुळे गळाला.

Karjat Unseasonal Rain
Newasa Paiskhamb Ekadashi: षट्तिला एकादशीला नेवासा पैस खांब मंदिरात भाविकांचा महासागर

हवामानावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. गव्हाला काही प्रमाणात हा पाऊस लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे. फळबागांना मात्र या पावसामुळे नुकसानीचा फटका बसला आहे. रब्बी पिके सध्या फुलोऱ्यात आहेत. काही भागांमध्ये ज्वारी दाणे भरण्याच्या स्थितीत आहेत. हरभरा पिकावर ढगाळ हवामानामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news