Karjat Murder Case: कर्जतमध्ये मुलानेच वडिलांचा खून करून जाळले प्रेत; तपासात दुसरा खूनही उघड

चिंचोली रमजान येथील धक्कादायक घटना; जावयाच्या कबुलीजबाबातून अकोल्यातील प्रेयसीच्या खुनाचा गुन्हाही उघडकीस
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

नगर/कर्जत: कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथे वडील बेपत्ता झाल्याची तक्रार मुलानेच दिली; मात्र पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली. मुलानेच वडिलांचा खून करून मृतदेह जाळल्याचे उघड झाले असून, त्याला सून व जावयाने मदत केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, वृद्धाच्या जावयाने अकोला येथे प्रेयसीचा खून केल्याचीही कबुली दिल्याने दुसरा खुनाचा गुन्हा उघडकीस आला.

Murder Case
Ahilyanagar ZP Budget 2026: जिल्हा परिषद अर्थसंकल्प 59.55 कोटींचा; ऊस-डाळिंबासाठी एआय तंत्रज्ञान, विविध नावीन्यपूर्ण योजना

सुनील रामदास राठोड (वय 37, रा. नानासाहेब पातूर, ता. पातूर, जि. अकोला, हल्ली रा. आंबेठाण रोड, चाकण, पुणे), आकाश बापू गाढवे, पायल ऊर्फ आकांक्षा आकाश गाढवे (दोघे रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रथमेश ऊर्फ भावेश दिगंबर चांदुरकर, अमोल भिकाजी लाटकर (दोघे रा. पुनोती, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) अशी पसार आरोपींची नावे आहेत. बापू आनंदा गाढवे (वय 60, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मिरजगाव पोलिस ठाण्यात आकाश बापू गाढवे (रा. चिंचोली रमजान) याच्या खबरीवरुन 5 मार्च रोजी बापू गाढवे बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

Murder Case
Pathardi Panchayat Samiti Inspection: पाथर्डी पंचायत समितीत सीईओंची झाडाझडती; गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने नातेवाइकांकडे विचारपूस केली असता खबर देणाऱ्या आकाश गाढवेविषयी पथकास संशय निर्माण झाला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने मेहुणा सुनील रामदास राठोड व त्याच्या नातेवाइकांनी वडिलांचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. पथकाने सुनील राठोडची माहिती काढली असता त्याचा मित्र सचिन सारवान (रा. खळवाडी, शेगाव) याच्या घरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने शेगाव येथे जाऊन राठोडला पाठलाग करून पकडले.

Murder Case
Nepti Water Dispute: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून नेप्तीत दोन गटांत राडा

चौकशीत राठोडने दिलेल्या माहितीनुसार, आकाश गाढवे, पायल ऊर्फ आकांक्षा गाढवे यांच्यासह प्रथमेश चांदूरकर, अमोल लाटकर यांना बापू आनंदा गाढवे याची शेतजमीन विकून पैसे घ्यावयाचे होते. परंतु, बापू शेती विकू देत नव्हता. त्यावरून 4 मार्च रोजी दुपारी घरामध्ये बापूचा तोंडावर उशी ठेवून व गळा आवळून खून केला. घराजवळील लाकडे गोळा करून डिझेलच्या साह्याने प्रेत जाळून टाकल्याची कबुली राठोडने दिली. पोलिसांनी आकाश गाढवेला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक दीपक मेढे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder Case
Kopargaon Administration Initiative: ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रम यशस्वी; कोपरगावात 75 शेतरस्ते वाद निकाली

जावयाने केला प्रेयसीचा खून

सुनील राठोडने सांगितले की, त्याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) हिच्याशी प्रेमसंबंध होते. ती गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. त्यावरून 16 नोव्हेंबर 2025 रोजी खून करून तिचा मृतदेह धनेगाव (ता. बाळापूर, जि. अकोला) परिसरामध्ये अर्धवट जाळून टाकल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार बाळापूर पोलिस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news