Karjat Nagaradhyaksha Election: कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार बिनविरोध; 10 जुलैला अधिकृत घोषणा

रोहिणी घुले यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक प्रक्रिया; एकमेव अर्ज आल्याने छाया शेलार यांची निवड निश्चित
Karjat Nagaradhyaksha
Karjat NagaradhyakshaPudhari
Published on
Updated on

कर्जत: कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया सुनील शेलार यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून १० जुलै रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Karjat Nagaradhyaksha
Ahilyanagar Hotel License Suspended: अहिल्यानगरात मोठी कारवाई! हॉटेल संगमसह 6 हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका

तत्कालीन नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सादर केला. राजीनाम्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Karjat Nagaradhyaksha
Ahilyanagar Heavy Rain: अहिल्यानगरात मुसळधार पावसाचा कहर! घाटघर-रतनवाडीत 321 मिमी पाऊस; भंडारदरा, मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी छाया शेलार आज दुपारी नगरपंचायत मध्ये आल्या, तेव्हा मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ग्रामदैवत गोंधळ महाराज यांचा जय हो तसेच भारतीय जनता पक्ष व राम शिंदे यांच्या नावाने जोरदार घोषणा समर्थकांनी दिल्या.

Karjat Nagaradhyaksha
Mahavitaran Negligence: चिमुरडीच्या मृत्यूनंतर महावितरण कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन

नगराध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपाच्या छाया शेलार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. छाया शेलार यांनी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे, जिल्हा सरचिटणीस अशोक खेडकर, गटनेते प्रा. सतीश पाटील, नगरसेविका लंकाबाई खरात, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, अमृत काळदाते, सुनील शेलार, देविदास खरात, तालुका सरचिटणीस स्वप्नील तोरडमल, शरद शेलार, बंटी यादव, उदयसिंग परदेशी, पवन ढेरे, साईराज शेलार, उमेश जपे, रोहित ढेरे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Karjat Nagaradhyaksha
Ahilyanagar Crime: जामिनावर सुटताच बेकायदेशीर रॅली; अहिल्यानगरातील सराईत गुन्हेगार भोऱ्या काळे जेरबंद

दरम्यान, राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सभापती राम शिंदे मुंबई येथे होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे १३ नगरसेवकांशी संवाद साधून नगराध्यक्षपदाबाबत चर्चा केली. त्यानंतर छाया शेलार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापती राम शिंदे यांच्या निर्देशानंतर छाया शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, कर्जत नगरपंचायतीतील सत्तांतरानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांनी ठरल्याप्रमाणे मुदतीत राजीनामा दिला नाही. यामुळे दोन अडीच महिने शहरातील जनतेला खूप त्रास सहन करावा लागला. मात्र यास आम्ही कुणीही जबाबदार नसून आमचे विरोधक घुले पाटील जबाबदार आहेत. यापुढे कर्जतमध्ये फसवाफसवीचे राजकारण चालणार नाही.

गटनेते प्रा. सतीश पाटील

सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. कर्जतकरांच्या विविध समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.

छाया सुनील शेलार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news