Karjat Additional District and Sessions Court: कर्जतला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मंजुरी; मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर वकिलांचा जल्लोष

कर्जत-जामखेडच्या नागरिकांना मोठा दिलासा; न्यायदान प्रक्रिया होणार अधिक जलद, सुलभ आणि प्रभावी
Karjat Additional District and Sessions Court
Karjat Additional District and Sessions CourtPudhari
Published on
Updated on

कर्जत: कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून, कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे वृत्त समजताच कर्जत न्यायालय परिसरात वकिलांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.

Karjat Additional District and Sessions Court
Ahilyanagar Private Moneylender Land Grab: 'खासगी सावकाराने तीन एकर शेती बळकावली'; शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी

या वेळी तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात उपाध्यक्ष ॲड. दत्ता चव्हाण, सचिव ॲड. अविनाश मते, ॲड. सचिन रेणुकर, ॲड. संजय गवारे, ॲड. नामदेव खरात, ॲड. भाऊसाहेब क्षीरसागर, ॲड. बी. बी. बागल, ॲड. शिवाजीराव गुंजाळ, ॲड. संजीवन गायकवाड, ॲड. आर. आर. जाधव, ॲड. उत्तम नेवसे, ॲड. अभय खेतमाळस, ॲड. संदीप पाटील, ॲड. सैफ सय्यद, ॲड. विनोद लष्कर आदी उपस्थित होते.

Karjat Additional District and Sessions Court
Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत पाणीसाठ्याची झपाट्याने वाढ; नगरवरील समन्यायी पाणीवाटपाची टांगती तलवार दूर होण्याची चिन्हे

या वेळी ॲड. शेवाळे म्हणाले की, कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व वकिलांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरल्यामुळेच यास मान्यता मिळाली आहे.

Karjat Additional District and Sessions Court
Shrigonda Loni Protest: लोणी आंदोलनाने श्रीगोंद्याच्या मनमानी कारभाराला दिला थेट इशारा!

ते पुढे म्हणाले की, यासाठी आर्थिक तरतुदी तत्काळ करण्यात आल्या आहेत. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, हा निर्णय दोन्ही तालुक्यांतील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे. या निर्णयामुळे कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित होणार असून, न्यायदान प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि प्रभावी होणार आहे. त्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून, वेळ व खर्चाचीही बचत होईल. लवकरच याचे उद्‌घाटनही करण्यात येईल, असे शेवाळे म्हणाले.

Karjat Additional District and Sessions Court
Nevasa Shiv Panand Roads: नेवास्यात शिवपाणंद रस्त्यांचा प्रश्न कायम; सरकारी आदेशांनंतरही शेतकरी प्रतीक्षेत

राज्य शासनाने वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार या न्यायालयासाठी एका न्यायिक अधिकाऱ्याचे पद, शासकीय अभियोक्ता कार्यालयासह सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची २२ पदे, तसेच ७ मनुष्यबळाच्या सेवा मंजूर केल्या आहेत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे कर्जत व जामखेड तालुक्यातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news