Ahilyanagar Private Moneylender Land Grab: 'खासगी सावकाराने तीन एकर शेती बळकावली'; शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी

व्याजाच्या व्यवहारातून दबाव टाकून जमिनीचे कागद करून घेतल्याचा दावा; न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
Illegal Moneylending
Illegal MoneylendingPudhari
Published on
Updated on

नगर तालुका: तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाची खासगी सावकाराने सुमारे तीन एकर शेती बळकावल्याचा आरोप उपनिबंधक, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. नामदेव उमाप, उत्तम उमाप, वसंत उमाप, ताराबाई वाघमारे यांनी याबाबत निवेदन दिले असून, निवेदनामध्ये खासगी सावकारकीबाबत विविध आरोप करण्यात आले आहेत.

Illegal Moneylending
Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत पाणीसाठ्याची झपाट्याने वाढ; नगरवरील समन्यायी पाणीवाटपाची टांगती तलवार दूर होण्याची चिन्हे

निवेदनानुसार अर्जदारांनी २०१६मध्ये आर्थिक अडचणीमुळे खासगी सावकाराकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्यानंतर मूळ रकमेपेक्षा अनेक पटींनी अधिक रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्याजाच्या व्यवहारातून दबाव निर्माण करून त्यांच्या मालकीच्या शेतीसंदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Illegal Moneylending
Shrigonda Loni Protest: लोणी आंदोलनाने श्रीगोंद्याच्या मनमानी कारभाराला दिला थेट इशारा!

संबंधित व्यवहारात त्यांच्या कुटुंबातील सर्व वारसांची संमती नसताना जमिनीचे दस्तऐवज तयार करण्यात आले. कोळपे आखाडा परिसरातील सुमारे तीन एकर शेती संबंधित सावकाराने खासगी सावकारकीच्या पैशातून बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी केल्यास सर्व बाबींचा उलगडा होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Illegal Moneylending
Nevasa Shiv Panand Roads: नेवास्यात शिवपाणंद रस्त्यांचा प्रश्न कायम; सरकारी आदेशांनंतरही शेतकरी प्रतीक्षेत

जमीन परत मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांना वारंवार मानसिक त्रास, दबाव व धमक्या दिल्या जात आहेत. या जमिनीची परस्पर विक्री केल्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता जातिवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत वातावरणात जीवन जगत असल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असलेली शेती हिरावली गेल्याने मोठे आर्थिक संकट ओढवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Illegal Moneylending
Ahilyanagar Farmer Loan Waiver: अहिल्यानगरात कर्जमुक्तीला वेग; पहिल्या यादीतील १.१० लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी

या जमिनीचा व्यवहार संपूर्णपणे खासगी सावकारकीतूनच झालेला आहे. संबंधित सावकाराचे ठरलेल्या व्याजासह पैसे देण्याची तयारी दाखवूनही जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली आहे. खासगी सावकारकीबाबतचे सर्व पुरावे आहेत. तसेच व्यवहारात असणाऱ्या मध्यस्थांनाही संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळणे गरजेचे आहे; अन्यथा संघटनेमार्फत कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्यात येईल.

वसंत उमाप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news