Minor Assault Ahilyanagar: कान्हूरपठार येथे संताप! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बहिणीचा विनयभंग

ब्लॅकमेल करून अत्याचाराचा संतापजनक प्रकार; सात जणांवर गुन्हा, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Minor girl assault
Minor girl assaultPudhari
Published on
Updated on

पारनेर : ओळखीचा गैरफायदा घेत एकाने 15 वर्षीय मुलीला धमकावत अत्याचार केला. हे त्याने मित्राला सांगितले. मित्रानेही बदनामीची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. नंतर पीडित मुलीच्या 13 वर्षे वयाच्या बहिणीला पाच जणांच्या टोळक्याने महिनाभरापासून त्रास देत वारंवार विनयभंग केला. पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील हा संतापजनक प्रकार समोर आला. पोलिसांनी सात जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Minor girl assault
LPG Price Hike Protest: गॅस दरवाढीविरोधात श्रीगोंदा-पाथर्डीत काँग्रेसचा एल्गार

पीडित मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 9 मार्च रोजी त्या पारनेरल गेल्या. घरी परतल्या तेव्हा दुपारी साडेचार वाजता दोन्ही मुली घरी आल्या. संशय आल्याने त्यांनी लहान मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता गावातील विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे, शुभम अल्हाट, रोहित संजय चत्तर यांनी व्हॅनमधून (एमएच 12 एएफ 6625) वेसदरे येथे फिरण्यासाठी नेले होते. आमच्याकडे तुमचे फोटो आहेत. तुम्ही आल्या नाहीत तर ते व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचे मुलीने सांगितले.

वेसदरे येथे जाताना पीडित मुलींसोबत आणखी तीन मुली आरोपींसोबत होत्या. प्रवासात आरोपी मुलींशी लगट करून त्यांचा वारंवार विनयभंग करत होते. वेसदरे येथे आरोपी पाचही मुलींना दरीत उड्या मारा असे सांगत होते. त्याच वेळी मुलीचे काका घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी व्हन घेऊन तेथून पसार झाले.

Minor girl assault
Pathardi Credit Society Fraud: ‘भगवानबाबा’ मल्टिस्टेट सोसायटी घोटाळा; पदाधिकाऱ्यांसह 13 जणांवर गुन्हा

दोन्ही पीडित मुलींकडे अधिक चौकशी केली असता लहान मुलीने सांगितले की, दोन मार्च रोजी दुपारी शुभम आल्हाटने घरासमोर येऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलावले. मुलगी गेली तेव्हा तिथे शुभमने विनयभंग करत तिचे फोटो काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी फिर्याद पीडित मुलींच्या वडिलांनी दिली. त्यात म्हटले आहे, की मोठ्या मुलीनेही आपल्यावर झालेले अत्याचार कथन केले. दिवाळीनंतर शाळेत जात येत असताना तिची ओळख प्रसाद संदीप साळवे याच्यासोबत झाली. प्रसादने 25 डिसेंबर रोजी दुपारी तिला एका मुलीच्या घरी बोलावून जिवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. कोणाला सांगितले जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली.

Minor girl assault
Sangamner Road Development Fund: संगमनेर तालुक्यात रस्ते व पुलांसाठी 31 कोटींचा निधी

आरोपी साळवे याने ही बाब त्याचा मित्र अनिल ऊर्फ गुंड्या किशोर साळवे यास सांगितली. त्यानंतर अनिलने त्याबाबत ब्लॅकमेल करत, माहिती व्हायरल करण्याची धमकी देत दिली. त्याला समजावण्यासाठी मुलगी त्याच्या घरी गेली, तेव्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला. शिक्षण बंद होण्याच्या भीतीने मुलींनी या घटना घरी सांगितल्या नाहीत, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दि.11 मार्च रोजी प्रसाद संदीप साळवे (वय 23, रा. कान्हुरपठार), अनिल ऊर्फ गुड्या किशोर साळवे (वय 23) यांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news