Pathardi Credit Society Fraud: ‘भगवानबाबा’ मल्टिस्टेट सोसायटी घोटाळा; पदाधिकाऱ्यांसह 13 जणांवर गुन्हा

जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशानंतर पाथर्डी पोलिसांची कारवाई
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

पाथर्डी : श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवींना गंडा घातल्याच्या आरोपावरून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. नगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Fraud Case
Junnar Onion Price: जुन्नरमध्ये कांद्याची काढणी जोरात; भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत

अकोला (ता. पाथर्डी) येथील वैद्यकीय व्यवसायिक अरविंद संतोष नागरे (वय 34) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जास्त व्याजदराचे आमिष दाखवून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना संस्थेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार नागरे यांनी संस्थेत बचत खाते उघडून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली. मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यात 44 लाख 24 हजार 447 रुपये इतकी रक्कम शिल्लक होती. तसेच त्यांच्या आई गंगूबाई संतोष नागरे यांच्या खात्यातही 21 लाख 89 हजार 161 रुपये इतकी रक्कम होती. मात्र, वारंवार मागणी करूनही ही रक्कम परत न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Fraud Case
Madhi Kanifnath Devsthan controversy: मढी कानिफनाथ देवस्थान वादावर संजय मरकड यांचे स्पष्टीकरण

पैसे परत करण्यासाठी संस्थेकडून नंतर काही धनादेश देण्यात आले होते; मात्र ते सर्व धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटले नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पाथर्डी पोलिसांनी चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हाईस चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य, संचालक शांतलिंग नागनाथ साखरे, जयशाली मयूर वैद्य, राम लक्ष्मण पोपळघट, दिनेश शिवनाथ वैद्य (तत्कालिन संचालक, सर्व रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), किशोर अनिल सुरवसे, नितीन सोपानराव तुपे (रा. पिंपळगाव कासार, ता. पाथर्डी), योगेश तुकाराम गायकवाड, वैशाली योगेश गायकवाड (तत्कालिन संचालक, रा. राका कॉलनी, नाशिक),अनिल कचरु तिजोरे ,पार्वती महादेव राऊत व व्यवस्थापक अविनाश सुधाकर

Fraud Case
Sangamner Road Development Fund: संगमनेर तालुक्यात रस्ते व पुलांसाठी 31 कोटींचा निधी

आंधळे (रा. जिरेवाडी, ता. पाथर्डी) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काही संचालकांच्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे देण्यात आली असून अनेक कर्जप्रकरणे विनातारण दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार संस्थेच्या माध्यमातून सुमारे 30 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारांचा संदर्भ समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे तपास करीत आहे. फिर्यादी तर्फे न्यायालयात ॲड. पंकज खराडे यांनी बाजू मांडली.

Fraud Case
Ahilyanagar ZP Fake Disability Certificate: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी अहिल्यानगर जिल्हा परिषदेत 16 कर्मचारी निलंबित

ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले

श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट सोसायटीच्या पाथर्डी शाखेतील ठेवीदारांच्या माहितीनुसार या शाखेत सुमारे नऊ कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या असल्याचे समोर आले आहे. मात्र ही रक्कम मिळत नसल्याने ठेवीदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मागील आठवड्यात ठेवीदारांनी ठेवी मिळवण्यासाठी आंदोलन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news