

पारनेर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्यावी, अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील समविचारी बहुजन संघटनांतर्फे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, डोंगराळे गावातील चार वर्षांच्या यज्ञा दुसाने या चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर कृत्याचा निषेध करत, या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला तत्काळ कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
आरोपीला तातडीने कठोर शिक्षा मिळाली नाही, तर समविचारी संघटना राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.
निवेदनावर समविचारी संघटनांचे पदाधिकारी अमित जाधव, किरण सोनवणे, आरती सोनवणे, ईश्वर भोसले, संजुभाऊ सोनवणे, संपत पवार, अविनाश देशमुख, अविनाश रोकडे, सुनील शिंदे, संदीप राजगुरू, गौतम गायकवाड, सचिन नगरे, साळवे संदीप, आयुब शेख, पवार अमोल, किरण गायकवाड, दीपक साळवे, बाबुराव इंगळे, रमेश गायकवाड, नितीन गरुड, दादू जाधव, भागाराम साळवे, सिद्धांत पवार, नितीन सातपूते, समर्थ औटी, विकास सोनवणे, रोहित धोत्रे, श्रेयस कसबे, राजेश सांगळे, रोहन भिंगारदिवे, सम्राट पवार, उमेश साळवे, प्रकाश उघडे, अशोक जाधव आदींच्या सह्या आहेत.