Jamkhed Water Shortage: जामखेडमध्ये पाणीटंचाईचे संकट; टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

भुतवडा तलाव आटण्याच्या मार्गावर; गणेशनगर, नगर रोड परिसरातील नागरिकांना दिलासा
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

जामखेड: जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर असल्याने शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहरात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसून, गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील काही भागासाठी व लगतच्या वाड्या-वस्त्यांना गी झळ बसत असून, ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी जामखेड नगरपरिषदेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Water Supply
Gold Silver Price Fall: सोन्याचे दर १० हजारांनी, चांदी ३० हजारांनी घसरली

आज शहराजवळील गणेशनगर, नगर रोड परिसरात टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक तात्याराम पोकळे, श्रीराम डोके, अमित चिंतामणी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. टँकरद्वारे पाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Water Supply
Shevgaon Crime News: भाजप तालुकाध्यक्षास मारहाण; चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या-ज्या भागात पाण्याची अडचण निर्माण होईल, त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Water Supply
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: ‘ओटीएस’ची २७ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर

नगराध्यक्ष चिंतामणी म्हणाल्या, की दुष्काळाची परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरातील ज्या भागात पाण्याची अडचण असेल, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.

Water Supply
Visapur Dam News: विसापूर तलावात ५९ टक्के पाणीसाठा, तरी आवर्तन नाही; शेतकरी नाराज

ही दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. दरम्यान, आगामी काळातील पाण्याचे नियोजन आणि वितरण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.