

सावेडी: जागतिक स्तरावरील वाढती महागाई, तसेच यूएस फेडरल रिझर्व (9 डिसेंबर) होणार्या बैठकीत पुन्हा व्याजदर वाढीची शक्यता असल्याने सोन्याच्या दरात 10 हजार रुपये, तर चांदी 30 हजार रुपयांनी घट झाली ( शनिवार दि. 20) नगर सराफ बाजारात सोने 1 लाख 27 हजार रुपये तोळा, तर चांदी 1 लाख 53 हजार रुपये प्रति किलो. (जीएसटीसह )प्रमाणे खरेदी विक्री होत आहे.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिजर्व बँकेकडून 27, 28 ऑक्टोबरमधे झालेल्या बैठकीत 3.75 %वरुण 4.00% व्याजदर वाढविण्यात आला. मात्र पुढील महिन्यात यू एस फेडरल रिझर्व चे नूतन अध्यक्ष केविन वाॅर्श यांच्या नेतृत्वाखालील 9 डिसेंबर 2026 ला होणार्या बैठकीत महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे सरकारी बॅंकेत बाॅन्ड गुंतवणूकीमध्ये अधिक परतावा मिळतो. आणि गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून बॉन्ड कडे वळतात.
त्यामुळे पुन्हा व्याजदर 4% वरुण 4:50%पर्यंत व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्याने व्याजदर वाढल्यास अमेरिकन डॉलर मजबूत होतात. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठे सोने आणि चांदीचे व्यवहार डॉलर मध्ये होतात. तसेच सोने हे कोणतेही व्याज किंवा उत्पन्न देत नाही. त्यामुळे लोक सोन्या ऐवजी अमेरिकन सरकारी यूएस फेडरल रिझर्व , बॉण्ड मध्ये पैसे गुंतवणूक पसंत करतात . त्या अनुषंगाने सोने-चांदीच्या दरात घट होत असल्याचे बाजारातील सोने-चांदी तज्ञांकडून मत वर्तवण्यात येत आहे.
नगर सराफ बाजारात (शनिवार दि. २१) सकाळी सोन्याची एक लाख २७ हजार रुपये तोळा, तर चांदीची एक लाख ५३ हजार रुपये किलो या दराने खरेदी विक्री केली जात होती. या वर्षात सोन्याचांदीच्या दरात मोठे चढ-उतार झाले आहेत. मात्र महिनाभरात सोने 16 हजार रुपये प्रतितोळा आणि चांदी 45 हजार रुपये प्रतिकिलो असे दर कमी झाले आहेत.
ॲडव्हान्स बुकिंग
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडीमुळे सोन्याचांदीच्या दरात घट झाल्याने पुढील महिन्यात लग्न सोहळ्यासाठी लागणाऱ्या सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी वधू-वर पक्षांकडून सोन्याची ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. जानेवारी 2027 मध्ये मकरसंक्रात सणानिमित्त महिलांकडून जोडवे, पैंजण, बिछुवे आदी चांदीचे दागिने खरेदी करण्यात येतात. त्यामुळे सोन्यासह - चांदीचे दागिने घडवणाऱ्या सुवर्णकारांना रोजगार वाढला आहे.