Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: ‘ओटीएस’ची २७ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर

दोन लाखांवरील कर्जमुक्तीसाठी एकवेळ परतफेड प्रक्रिया सुरू
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver SchemePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत जिल्ह्यातील पात्र २६ हजार ७०३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या २ लाखांवरील कर्जाची रक्कम भरावयाची अंतिम मुदत दि.३१ मार्च २०२७ पर्यंत राहील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्यामध्ये एकवेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची २ लाखांवरील शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर २ लाखाचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

बँकांकडील माहितीचे संस्करण करुन दि.२० नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हयातील २६, ७०३ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये पहायला मिळणार आहे.

Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme
Visapur Dam News: विसापूर तलावात ५९ टक्के पाणीसाठा, तरी आवर्तन नाही; शेतकरी नाराज

दरम्यान, केलेल्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशील, दि. 31 मार्च 2026 अखेरच्या थकबाकीची रक्कम, एकवेळ समझोता प्रमाणे थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम व शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमुद केलेली असणार आहे.

Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme
Prajakta Tanpure: आमदार तनपुरे यांच्या पुण्यातील घरात चोरी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

शेतकऱ्याने प्रसिध्द यादीतील तपशील तपासून त्यांच्या हिश्याची २ लाखावरील रक्कम संबंधीत बँकेत भरणा करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्जखाते एकाच बँकेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेच्या कर्जखात्यात भरणा करावी.

ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांच्या कोणत्याही कर्जखात्यात भरण्याची सुविधा आहे. मात्र ओटीएस योजनेप्रमाणे बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा जास्तची रक्कम त्या खात्यात भरु नये.

शेतकऱ्याने २ लाखांवरील रक्कम संबंधीत बँकेत भरल्यानंतर बँकेमार्फत ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल व शेतकऱ्यास कळविले जाईल. अशा शेतकऱ्याच्या थकबाकीचे अदययावितीकरण झाल्याच्या तीन दिवसानंतर संबंधीत शेतकऱ्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

योजनेच्या निकषानुसार अशा शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टंग नोंदणी करणे आवश्यक असून ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टंग नोंदणी केलेली आहे व आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे अशा शेतकऱ्यांना २ लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या यादया यापुढेही प्रसिध्द करण्यात येतील.

आतापर्यंत 1363 कोटींची कर्जमुक्ती

योजनेतून पहिल्या टप्यामध्ये दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या जिल्हयातील १,५८,१८८ लाभार्थ्यांची खाती आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झालेली होती. त्यापैंकी १,४७,८३४ लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यातील १,४३,२९३ लाभार्थ्यांची १३६९.६९ कोटी रक्कमेची कर्जमुक्ती करण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.