Jal Jeevan Mission Failure: संगमनेर-अकोलेच्या पठार भागात जलजीवन मिशनचा बोजवारा; नळ कोरडेच, योजना कागदावर!

अनेक गावांत पाईपलाईन, पाण्याच्या टाक्यांची कामे अपूर्ण; यंदा टँकरनेही तहान भागविण्याचे आव्हान
Sangamner Water Crisis
Sangamner Water CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

घारगाव: संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेला घरघर लागली आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यातील पठार भागात तर अक्षरशः जलजीवन योजनेचा बोजवारा उडाला आहे. कुठे पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या अपूर्ण आहेत, अनेक ठिकाणी ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत, तर ज्या योजना पूर्ण आहेत, त्यातून प्रत्यक्षात पाणीपुरवठाच सुरू नसल्याची विदारक परिस्थिती समोर आली आहे.

Sangamner Water Crisis
Nevasa Sugarcane Transportation Protest: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कारखानदारांची केराची टोपली; प्रहारने अडविल्या ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या

पठार भागातील काही गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. कमी पाऊस, सातत्याने खालावणारी भूजल पातळी, आटणाऱ्या विहिरी आणि मर्यादित जलसाठे यामुळे येथील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत जलजीवन मिशनमधून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नळजोडण्या पूर्ण झालेल्या नाहीत. काही ठिकाणी पाईपलाईन टाकूनही पाणी उपलब्ध नाही, तर काही योजनांमध्ये वीजपुरवठा, पंपिंग यंत्रणा आणि जलस्रोतांच्या उपलब्धतेचा प्रश्न कायम आहे.

Sangamner Water Crisis
Ahilyanagar Drought Water Shortage: अहिल्यानगर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; ३३ गावांची तहान टँकरवर

प्रत्यक्षात काही ठिकाणी झालेली पाईपलाईन, जोडण्या आणि इतर बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी आहेत. कामे पूर्ण झाल्याचे दाखवूनही नियमित पाणीपुरवठा होत नसेल, तर संबंधित कामांची तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष गुणवत्ता चाचणी होणे अत्यावश्यक असल्याचा सूर आहे. योजनेच्या नावाखाली निधी खर्च झाला, मात्र गावकऱ्यांच्या घरातील नळ कोरडेच राहिले, तर त्याची जबाबदारी कोणाची? संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग आणि देखरेख करणारे अधिकारी यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील.

Sangamner Water Crisis
Guha Fake Student Enrollment Case: गुहाच्या बोगस पटसंख्या प्रकरणात १३ जणांना नोटिसा; सहा मुख्याध्यापक अडचणीत

जिल्हा परिषद तसेच जीवन प्राधीकरणाने कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ देण्याऐवजी त्यांच्यावर कडक कारवाई करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. निकृष्ट कामांची पुनर्तपासणी करून दोषींवर कारवाई करावी. प्रत्येक गावातील जलजीवन मिशनची सद्यस्थिती, खर्च झालेला निधी, उर्वरित कामे आणि पाणीपुरवठा सुरू होण्याची निश्चित मुदत जाहीर करावी. तसेच अपूर्ण योजनांची जबाबदारी निश्चित करून कामे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाने नियमित आढावा घ्यावा.

Sangamner Water Crisis
Rojgar Hami Yojana Pending Payments: रोहयोची १५ कोटींची देयके चार वर्षांपासून थकीत; पाथर्डीतील शेतकरी आर्थिक संकटात

यंदा टँकरही अपुरे पडतील?

यंदा पाण्याच्या उपलब्धतेबाबत निर्माण होणारी परिस्थिती अधिक चिंताजनक ठरू शकते. आतापर्यंत पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर शासनाकडून टँकर सुरू करून तात्पुरता दिलासा दिला जात होता. मात्र, जलस्रोतच आटण्याची वेळ आल्याने टँकरसाठी पाणी आणायचे कुठून, हा प्रश्न निर्माण होणार आहे. विहिरी, बोअरवेल आणि खासगी जलस्रोतांवरही पाण्याचा ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी केवळ टँकरवर अवलंबून राहून नागरिकांची तहान भागविता येणार नाही.त्यासाठी प्रशासनाला तयारीत रहावे लागणार आहे.

संगमनेर-अकोले पठार भागातील अनेक गावांना दरवर्षी उन्हाळ्यात शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, यंदाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाण्याचे स्रोतच संपुष्टात येण्याची भीती असताना जलजीवन मिशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.

भगवान काळे, ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.