Illegal Gender Test: मुलगा की मुलगी...दहा हजारांत खबर; पिंपरी निर्मळ येथे गर्भलिंग निदान केंद्र

नेवाशाच्या डॉक्टरला बेड्या; एजंटसह 10 जणांवर गुन्हा
Illegal Gender Test
Illegal Gender TestPudhari
Published on
Updated on

नगर: गरोदर महिलांची बेकायदा तपासणी करून मुलगा की मुलगा सांगणाऱ्या गर्भलिंग निदान केंद्राचा पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. पिंपरी निर्मळ (राहाता) येथील माळरानात सुरू असलेल्या या बोगस केंद्राचा भांडाफोड करण्यासाठी महिला पोलिसालाच गर्भवती असल्याचा बनाव करावा लागला.

10 हजार रुपये घेऊन गर्भात मुलगा की मुलगी याची खबर सांगितली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर, एजंट व तपासणीसाठी आलेल्या 8 गर्भवती महिलांचे पती, नातवाइकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्या 9 जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Illegal Gender Test
Parner Bike Theft Case: पारनेरमध्ये दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 10 मोटारसायकली जप्त

डॉ. राहुल आबासाहेब भणगे (बीएएमएस, रा.भानसहिवरे, ता. नेवासा) व अभिजीत दिलीप भुसाळ (जीएनएम नर्सिंग, पिंपरी निर्मळ) अशी गर्भलिंग निदान करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या दोघांसह गर्भवती महिलांचे पती, नातेवाईक अशा नऊ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पिंपरी निर्मळ गावात कॅनॉललगत दोन खोल्यांत गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली. वाकचौरे यांनी श्रीरामपूर, लोणी पोलिस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करत कारवाईचे आदेश दिले.

या केंद्राचा भांडाफोड करण्यासाठी महिला पोलिसालाच गर्भवती असल्याचा बनाव करावा लागला. ही महिला पोलिस बुधवारी रात्री गर्भलिंग निदानासाठी पोहचली. तेथील परिस्थिती पाहून तिने मोबाईलवर संदेश पाठवत पोलिस पथकाला छाप्याची सूचना दिली.

कोणालाही पसार होता येऊ नये यासाठी पोलिस पथकाने केंद्राच्या चोहोबाजूने घेरा घातला. त्यानंतर थेट त्या घरात प्रवेश करत छापा टाकला. त्यावेळी सात गर्भवती महिला तेथे गर्भलिंग निदान करण्यासाठी उपस्थित असल्याचे दिसून आले. या महिला गर्भवती असल्याची खात्री पोलिसांनी लोणीतील शासकीय हॉस्पिटलमध्ये करून घेतली.

Illegal Gender Test
Sangamner Pipeline Damage Farmers: संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान; पाइपलाईन फुटल्याचा ठेकेदारावर आरोप

बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावरून पोलिसांनी सोनोग्राफी मशीन, लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे, रोकड व वाहनांसह सुमारे 24 लाख 9 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती गोपाळराव पवार यांच्या फिर्यादीवरून डॉक्टरासह 9 जणांविरोधात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा तसेच गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा 1994 अंतर्गत लोणी पोलिसात गुन्हा नोंदल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

डॉक्टर व एजंटाने आतापर्यंत किती महिलांच्या गर्भलिंग निदान चाचण्या केल्या, त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून खरेदी केले, तसेच परजिल्ह्यांतील गर्भवती महिलांपर्यंत गर्भलिंग निदानाची माहिती कशी व कोणामार्फत पोहोचवली जात होती. मुलगीचे निदान झाल्यानंतर पुढे काय केले जात होते, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती पवार, डॉ. गोकुळ घोगरे, उपनिरीक्षक आशिष चौधरी, असिर सय्यद, साईनाथ राशीनकर, सचिन शेवाळे, भोईटे, बेबी शिंदे, दादाभाऊ लोंढे, संदीप दरंदले, सचिन धनाड, अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एजंटाची चलाखी पण पोलिसांना सुगावा लागलाच!

डॉ. राहुल भणगे हा गर्भलिंग चाचणी करून मुलगा की मुलगा सांगत होता. अभिजीत भुसाळ हा एजंट डॉक्टराला ग्राहक मिळवून देत होता. गर्भलिंग निदानासाठी यूएसजी मशीनचा वापर केला जात होता. गर्भलिंग निदान केंद्राची माहिती फुटू नये यासाठी या महिलांना एजंट भुसाळ हा कारमधून बाभळेश्वर येथून केंद्राच्या ठिकाणी घेऊन येत होता.

महिलांचे पती, नातेवाइकांना तेथेच थांबवून ठेवले जात होते. बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव, पुणे येथून गर्भवती महिला तपासणीसाठी आल्याचे समोर आले. एजंट भुसाळ याने कितीही चलाखी केली तर त्याचा सुगावा पोलिसांना लागलाच अन्‌‍ भांडाफोडही झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news