Sangamner Pipeline Damage Farmers: संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान; पाइपलाईन फुटल्याचा ठेकेदारावर आरोप

चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे महावितरणच्या ठेकेदाराकडून पाइपलाईन फुटल्याचा आरोप; पाण्याअभावी पिके जळाली, शेतकऱ्यांची कारवाईची मागणी
Sangamner Pipeline Damage
Sangamner Pipeline DamagePudhari
Published on
Updated on

संगमनेर: तालुक्यातील चंदनापूरी येथील अनेक शेतकऱ्यांनी प्रवरा नदीवरून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी पाईपलाईन टाकली आहे. मात्र, महावितरणच्या केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून ही पाईपलाईन फुटल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आ. अमोल खताळ यांच्याकडे तक्रार करत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

Sangamner Pipeline Damage
Ahilyanagar Cooperative Money Laundering: खरात प्रकरणातून सहकारातील ‘काळा पैसा’ उघड; मनी लॉन्ड्रिंगचा संशय

या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले, तर काहींनी दागदागिने गहाण ठेवून मोठा खर्च केला. मात्र, ठेकेदाराने मनमानीने काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे-नाशिक बायपास महामार्गालगत असणाऱ्या खांडगाव रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू होते.

Sangamner Pipeline Damage
Ahilyanagar Drug Cases Action: अहिल्यानगरात अमली पदार्थांवर कारवाई; 4 महिन्यांत 55 जणांवर गुन्हे

यावेळी होलपास घेत असताना ठेकेदाराकडून दहा केजी सहा इंची अशा तब्बल 5 पाईपलाईन फोडल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराशी जवळपास दोन महिने वारंवार संपर्क साधून नुकसान भरून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने दिलेले पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

Sangamner Pipeline Damage
Ahilyanagar Crime: वाकोडीत किरकोळ वादातून निर्घृण खून; दोघे जेरबंद

अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून पाईपलाईन दुरुस्त केली. मात्र, विद्युत मोटार सुरू केल्यानंतर पाईपलाईनचे पाईप अनेक ठिकाणी फुटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे पाईप देऊन फसवणूक केल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.

Sangamner Pipeline Damage
Maharashtra Farm Loan Waiver: अहिल्यानगरमध्ये कर्जमाफीची प्रतीक्षा टोकाला; खरीप तोंडावर शेतकरी हवालदिल

पाण्याअभावी पीकं करपली

पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे पाण्याअभावी कांदा, गहू, हरभरा तसेच जनावरांच्या चाऱ्याची पिके जळून जात आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, चंदनापुरी परिसरातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी आ. अमोल खताळ यांची भेट घेत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news