Illegal Fetal Determination Racket: नाशिकच्या दोन डॉक्टरांना अटक; गर्भलिंग निदान प्रकरणातील नगर-नाशिकचे आरोपी वर्गमित्र

पुण्याहून खरेदी केले सोनोग्राफी मशीन; सहा डॉक्टरांसह आरोपींची संख्या 18 पर्यंत्त
Fetal Determination
Fetal DeterminationPudhari
Published on
Updated on

नगर: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यानंतर नाशिकपर्यंत पोहचले आहे. नाशिकचा डॉ.वल्टे याच्यासह लॅबचालकाला श्रीरामपूर पोलिसांनी काल नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. नाशिकचा डॉ. वल्टे आणि नेवाशाचा डॉ. भणगे हे वर्गमित्र असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, गुन्ह्यामध्ये 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी सहा डॉक्टर आहेत.

या प्रकरणात पुण्याच्या दोन डॉक्टर व एक व्यक्तीला श्रीरामपूर पोलिसांनी आधीच अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी, वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याच्याकडून लिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेले मशीन जप्त केले.

Fetal Determination
Coaching Classes Fees: नगरमध्येही खासगी क्लासेसची दुकानदारी तेजीत!

असे सापडले पुणे ते नाशिक धागेदोरे

पुणे येथून अटक करण्यात आलेले दोन डॉक्टर व एक मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखवताच, त्याने नाशिक येथील निफाड तालुक्यातील दोन डॉक्टरांनी देखील आपल्याकडून लिंगनिदान सोनोग्राफी मशीन विकत नेल्याचे माहिती दिली. त्यानुसार,पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पथक रवाना केले.

डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे, (वय 33, रा. निफाड, जि. नाशिक) याचा करजगाव (ता. निफाड) येथे दवाखाना आहे. याने पुण्याच्या आरोपींच्या माध्यमातून सोनोग्राफी मशीन घेतलेले आहे. विशेष म्हणजे तो नेवाशाचा डॉ. भणगेचा वर्गमित्र आहे. तर, दुसरा आरोपी सागर शांताराम उल्हाळ (वय 25 रा. नांदूर मधमेश्वर, जि. नाशिक) याची डॉक्टर वल्टेच्या शेजारी ब्लड टेस्टिंग लॅब आहे.

Fetal Determination
Nagar Crime: तरुणींचा पाठलाग करून विनयभंग; पोलिसांनी 12 तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

डॉ. वल्टे याने त्याची सोनोग्राफी मशीन याच्याच लॅबमध्ये ठेवली होती. या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची 4 दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news