Nagar Crime: तरुणींचा पाठलाग करून विनयभंग; पोलिसांनी 12 तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

सायकलवरून पाठलाग करून हातवारे करून लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले.
molestation case
molestation casePudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर शहरात भिस्तबाग चौक व पत्रकार चौक परिसरात दुचाकीवर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या संशयित तरुणाच्या 12 तासांत मुसक्या आवळल्या. ही कारवाई शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने केली.

अधिक माहिती अशी 20 मे 2026 रोजी रात्री 9 वाजता पीडित ही मैत्रिणीला भेटून दुचाकीवरून व्ही स्टार हॉटेल समोरील रोडवरुन घरी जात असताना एक अनोळखी तरुणाने मोटार सायकलवरून पाठलाग करून हातवारे करून लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले.

molestation case
Onion Price Crash: श्रीरामपुरात कांदा एक रुपया किलो; शेतकरी संघटना आक्रमक

त्यावेळी पीडितेने तिच्यासोबत घडत असलेल्या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हीडिओ तयार केला. पीडित तरुणीने तो व्हीडिओ इस्टग्रामवर व्हायरल करून व्हीडिओमधील तरूणास कोणी ओळखत असेल तर त्याचे नाव कळावा, असा मेसेज केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर असताना पुन्हा घडलेली घटना पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना व्हीडिओमधील संशयित तरूणास तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तयार करून व्हीडिओ मधील तरुणाचा शोध घेण्याकामी रवाना केले. पथकाने 12 तासांत अहिल्यानगर शहरातून त्या संशयित तरुणास ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता बंटी उर्फ संकेत ससाणे (रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. संशयित आरोपीला पुढील तपासाकामी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर केले.

molestation case
Crop Damage: अवकाळी नुकसान भरपाईसाठी प्रशासनाची 21 कोटींची मागणी

दरम्यान, याच संशयित आरोपीने असाच प्रकार अन्य एका तरुणी सोबतही केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार तन्वीर शेख करीत आहेत.

112 ला संपर्क करा

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल महिलांच्या सुरक्षेबाबत झिरो टॉलरन्स धोरण राबवत आहे. महिलांनी अशा घटनांची माहिती तत्काळ 112 या नंबर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news