Crime News: उदंड जाहले ‌‘गावठी कट्टे‌’! 15 महिन्यांत 72 पिस्तुल जप्त; पोलिसांची कारवाई

नगर पोलिसांनी मागील 13 महिन्यात 72 गावठी कट्टे जप्त करत 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
Crime News
Crime NewsPudahri
Published on
Updated on

नगर: एमपी, युपीतून छुप्या मार्गाने आलेल्या गावठी कट्ट्याने तरूणाईला विळखा घातल्याचे धक्कादायक चित्र समोर येवू पाहत आहे. नगर पोलिसांनी मागील 13 महिन्यात 72 गावठी कट्टे जप्त करत 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शहरासह गावखेड्यातही गावठी कट्टा सहज उपलब्ध होत असल्याचे कारवायादरम्यान दिसून आले. पूर्वी सराईत गुन्हेगारांकडेच दिसणारे कट्टे आता कॉलेज तरुणाच्या हातातही पोहचले आहेत. त्यातून होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी पोलिसांची झोप उडालीच पण सोबतच सामान्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.

Crime News
Sarubai Pesode Passed Away: देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांना मातृशोक; सरूबाई पेसोडे रविवारी पहाटे निधन

नेवासा, जामखेड, अहिल्यानगर शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर सर्रासपणे झाल्याचे समोर आले. या गोळीबारात नेवासा, जामखेड तालुक्यात दोघांची हत्या झाली. नगर शहरातही जुन्या वादातून गोळीबार झाला होता.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

गुन्हे शाखेने तीन महिन्यांत विविध ठिकाणी छापे घालून 15 गावठी पिस्तूल जप्त करत 16 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत 41 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

Crime News
Road Construction Issue: पैसे संपले...पेव्हरऐवजी मुरमाचा उतारा; महापालिकेच्या बांधकाम विभागाचा अजब कारभार

वीस हजारांत मिळतो कट्टा

सराईत गुन्हेगार परराज्यातून गावठी कट्टे आणून त्याची दहा/वीस हजारात विक्री करतात. सोशल मिडियामुळे तरूणाईत कट्ट्याची क्रेझ वाढली आहे. कट्टे विक्री करणाऱ्या एजंटांचा बंदोबस्त करून गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखा व पालिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांंसमोर आहे.

अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. नेवासा, श्रीरामपूर, जामखेड तालुक्यातील संशास्पद हालचाली असणाऱ्यांवर बारीक लक्ष आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news