Road Construction Issue: पैसे संपले...पेव्हरऐवजी मुरमाचा उतारा; महापालिकेच्या बांधकाम विभागाचा अजब कारभार

महापौर ज्योती गाडे यांच्या पाहणीत हा अजब नमुना समोर आला.
Road Construction Issue
Road Construction IssuePudhari
Published on
Updated on

डॉ. सूर्यकांत वरकड

शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी अटोकाट प्रयत्न करून तब्बल दीडशे कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातून 12 रस्त्यांची कामे पूर्ण झाली तर काहींची कामे प्रगतीपथावर आहेत. सावेडीतील तपोवन रोड-एकविरा चौक ते पारिजात चौक रस्ता कॉक्रिटीकरण केला जात असला तरी पेव्हरची साईडपट्टी करण्यासाठी पैशेच शिल्लक राहिले नाहीत, परिणाम मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा निर्णय महापालिकेच्या बांधकाम विभागाने घेतला आहे. महापौर ज्योती गाडे यांच्या पाहणीत हा अजब नमुना समोर आला.

दिगवंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी नगरोत्थान योजनेंतर्गत दीडशे कोटी रुपये आ. संग्राम जगताप यांच्या आग्रहाखातर दिले. त्या निधीतून शहरातील 24 रस्त्यांचे कॉक्रिटीकरण केले जात आहे. झोपडी कॅन्टीन ते जिल्हाधिकारी कार्यालय, लाल टाकी ते दिल्लीगेट, अमरधाम रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम अंशत: पूर्णत्वाकडे गेले आहे. सर्जेपुरा रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Road Construction Issue
Arun Mundhe News: आमदारकी सोडून नगराध्यक्ष व्हा; अरुण मुंढे यांचा आमदार मोनिका राजळे यांच्यावर घणाघात

तपोवन रस्ता-एकविरा चौक ते पारिजात चौक रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत असले तरी जवळपास वर्षभरापासून ते रेंगाळले आहे. महापौर ज्योती गाडे यांनी गत आठवड्यात या रस्ता कामाची पाहणी केली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूने चार/चार मीटरच्या साईडपट्ट्या सोडण्यात आल्या आहेत. शहरातील इतर रस्त्यांच्या साईडपट्ट्या पेव्हरने भरण्यात आल्या, पण या रस्त्याच्या पेव्हरसाठी पैसेच संपले आहेत. त्यासाठी स्वतंत्र निधी लागणार असून तो केव्हा येईल सांगता येत नाही.

Road Construction Issue
Ahilyanagar Property Tax Recovery: अहिल्यानगर महापालिकेची करवसुली घटली; कर्मचारी टंचाईचा परिणाम

त्यामुळे मुरूम टाकून साईडपट्टी भरली जाणार आहे. पावसाळ्यात मुरूम खचला जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्यावर डांबरीकरण करण्याचा सुपीक कल्पना बांधकाम विभागाने काढली. डांबरीकरणालाही निधी लागणार आहे, तो उपलब्ध करावा लागणार असून तशी तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

इस्टिमेटमध्ये विसर पडल्याने नामुष्की!

या रस्त्याचे इस्टीमेट तयार करताना साईडपट्टीचा विचार करून तशी तरतूद करणे गरजेचे होते. मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाला ही तरतूद करण्याचा विसर पडला. परिणामी आता मुरूम टाकून साईडपट्टी भरण्याची नामुष्की ओढावली आहे. नंतर पुन्हा निधीची तरतूद करून मुरूमावर डांबर टाकण्याचे घाटत आहे.- मनोज पारखे, शहर अभियंता, महापालिका.

रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. मुरूम टाकून साईडपट्ट्या भरल्या जाणार असल्या तरी त्यावर डांबरीकरण करावे लागणार असून त्यासाठी निधीची तरतूद करावी लागणार आहे.

- ज्योती गाडे, महापौर

12 मीटर असलेल्या या रस्त्याच्या साईडपट्ट्या मुरूम टाकून भरल्या जाणार आहेत. त्यावर डांबरीकरणासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता आहे.

- मनोज पारखे, शहर अभियंता, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news