Women Auto Rickshaw Driver: महिला रिक्षा चालक प्रशिक्षणातून अहिल्यानगरमध्ये महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय

सन फार्मा व मिटकॉन फोरमच्या उपक्रमातून 30 महिलांना रोजगाराची संधी
Women Auto Rickshaw Driver
Women Auto Rickshaw DriverPudhari
Published on
Updated on

नगर : महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सबळ बनविण्यासाठी सन फार्मा कंपनी आणि मिटकॉन फोरम सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘महिला रिक्षा चालक प्रशिक्षण उपक्रम‌’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अहिल्यानगर शहरातील 30 गरजू महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून, वाहतूक क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

Women Auto Rickshaw Driver
Tamasha Folk Art Maharashtra: तमाशा ही महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा; कलाकारांना शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे – डॉ. रावसाहेब कसबे

महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रशिक्षणामध्ये महिलांना रिक्षा चालविण्याचे तांत्रिक शिक्षण, वाहतुकीचे नियम, शहरातील प्रमुख मार्गांची माहिती, तसेच प्रवाशांशी सुसंवादाचे तंत्र शिकविण्यात येणार आहे. 20 दिवस प्रशिक्षण आणि 5 दिवस माहिती सत्र अशा एकूण 25 दिवसांच्या कोर्सद्वारे महिलांना सुसज्ज करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परमिट मान्यता आणि वाहन खरेदीसाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Women Auto Rickshaw Driver
Strawberry Farming Akole: आदिवासी भागात स्ट्रॉबेरीची यशस्वी नगदी शेती; रंध्यात प्रयोगशील शेतकऱ्याचा नवा आदर्श

या उपक्रमाद्वारे प्रशिक्षित महिला चालक शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, ज्येष्ठ नागरिक केंद्रे, तसेच एमआयडीसी परिसरातील कामगारांना सुरक्षित वाहतूक सुविधा देणार आहेत. महिलांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम अहिल्यानगर शहरात सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवास संस्कृती निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.=

Women Auto Rickshaw Driver
RadhaKrishna Vikhe Patil: गोदावरी खोऱ्यासाठी 90 हजार कोटींची योजना; घरकुलात अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणार – विखे पाटील

महिलांना रोजगार मिळवून देणे आणि समाजात त्यांचा सन्मान वाढविणे हे आमचे ध्येय असल्याचे मिटकॉन फोरम सोशल फाउंडेशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर अकबर शेख म्हणाले. या प्रकल्पासाठी रेश्माताई आठरे यांनी विशेष पुढाकार घेतला.

Women Auto Rickshaw Driver
Devendra Fadnavis : औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेणार नाही

या कार्यक्रमास सन फार्मा कंपनीचे प्रतिनिधी सोमनाथ दडस, तसेच स्वामिनी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका शितल सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान महिलांना वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा, वाहन देखभाल आणि नागरिकांशी संवाद कौशल्य याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news