

शिवाजी क्षीरसागर
संगमनेरः संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट- गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या हालचालींना गती आला आहे. गट- गणांनुसार आरक्षण जाहीर होताच, निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील गट- गणांची अतिम प्रभाग रचना नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. यात संगमनेर तालुक्यातील गट- गणांचा समावेश आहे. येथे एक गट व दोन गण वाढल्याने इच्छुकांना आता संधी मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका रखडल्यामुळे सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. गट- गणातील निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. श्रीगणेशोत्सवामुळे काहीशी रखडलेल्या या प्रक्रियेला आता वेग आला आहे. (Latest Ahilyanagar News)
या निवडणूक प्रक्रियेत विद्यमान आमदार अमोल खताळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कशी संधी देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
समनापूर गट व गण, निमोण गण- मालदाड, सायखिंडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, पळसखेडे, पिंपळे, कर्हे, सोनेवाडी, काकडवाडी, नान्नज दुमाला, निमोण, समनापुर, सुकेवाडी, कुरण, निंभाळे, खांजापूर, पारेगाव खुर्द, सोनोशी तर, तळेगाव गट व गण असे; वडगाव पान गण- चिंचोली गुरव, लोहारे, मिरपूर, कासारे, देवकौठे, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, तिगाव, तळेगाव, वडगाव पान , कोकणगाव, कवठे कमळेश्वर, निळवंडे, मेंढवन, माळेगाव हवेली, पोखरी, करुले. आश्वी बुद्रुक गट व गण; आश्वी खुर्द गण- निमगाव जाळी, चिंचपूर बुद्रुक, प्रतापपूर, सादतपुर, कौंची, औरंगपूर, आश्वी खुर्द, पिंप्री लौकी अजमपूर, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, खळी, दाढ खुर्द, चनेगाव, झरेकाठी, शेडगाव.
जोर्वे गट व गण; अंभोरे गण- कोल्हेवाडी , उंबरी, मनोली, रहिमपूर, ओझर खुर्द, कनकापूर, रायते, वाघापूर, जोर्वे, आंभोरे, पिंपरणे, कनोली, पानोडी, कोल्हेवाडी, डिग्रस, मालुंजे, ओझर बुद्रुक, हंगेवाडी, कोळवाडे.
घुलेवाडी गट व गण- गुंजाळवाडी गण- कसारा दुमाला, वेल्हाळे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, ढोलेवाडी, धांदरफळ बुद्रुक गट व गण- राजापूर गण- जवळे कडलग, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोझिंरा, चिकणी, निमगाव भोजापूर, धांदरफळ बुद्रुक- निमगाव खुर्द, धांदरफळ खुर्द, चिखली, मंगळापूर, राजापूर, निमगाव खुर्द, कौठै धांदरफळ, सांगवी.
चंदनापुरी गट व गण- संगमनेर खुर्द गण- निमज, पेमगिरी, नांदुरी दुमाला, खांडगाव, सावरचोळ, मिर्झापूर, शिरसगाव, रायतेवाडी, चंदनापुरी, सावरगाव तळ, हिवरगाव पावसा, झोळे, संगमनेर खुर्द, जाखोरी, निमगाव टेंभी, शिरापूर, खराडी, देवगाव.
बोटा गट व गण खंदरमाळवाडी गण- आंबी खालसा, कोठे बुद्रुक, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर, जवळे बाळेश्वर, सावरगाव घुले, कौठे खुर्द, वरुडी पठार, पिंपळगाव माथा, पिंपळगाव पठार, महालवाडी, बोटा, अकलापूर, घारगाव, आंबी दुमाला, भोजदरी , कुरकुंडी, वनकुटे, कुरकुंडी, म्हसवंडी, बोरबनवाडी.
साकुर गट व गण; पिंपळगाव देपा गण- वरवंडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे, शिंदोडी ,कर्जुले पठार, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, साकुर, जांभूळवाडी, नांदूर खंदरमाळ,जांबुत बुद्रुक, हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी असे आहेत.
राजकीय हालचालींना वेग!
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य उमेदवारांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. एकूणच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी शासकीय पातळीवर होणारी तयारी पाहता, गट- गणांचे आरक्षण जाहीर होताच, निवडणूक कार्यक्रम लवकरचं जाहीर होईल.
याबाबत तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, मात्र अंतिम प्रभाग गट- गणांची प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात राजकीय हालचालींना मात्र आता वेग आला आहे.
विखे, थोरात, खताळांमध्ये रंगणार दुरंगी सामना
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार अमोल खताळ असा दुरंगी सामना रंगणार आहे, मात्र माजी मंत्री थोरातांनी निवडणूक कार्यक्रमाची वाट न पाहता, संपूर्ण तालुक्यात अगोदरचं यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुती कशाप्रकारे निवडणूक हाताळते, यावरचं यश सर्व अवलंबून असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मित्र पक्षांना कशाप्रकारे कार्यकर्त्यांना सामावून घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काहींना सोईस्कर.. काहींना अडचण..!
दिवाळी अगोदर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारी करीत आहे. संगमनेर तालुक्यातील गट- गणात काहीसा बदल झाला आहे. यामुळे आता काहींना हा गट- गण सोईस्कर झाले आहेत, तर काहींची मात्र अडचण होणार आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. गावोगाव, वाड्या, वस्त्यांवर ते संपर्क वाढवित आहेत.