CM Fadnavis Jamkhed: "आम्ही जे बोलतो ते करतोच!" 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आपण लखपती दीदी योजनेचा लाभ देणार; मुख्यमंत्र्यांचे जामखेड सभेत आश्वासन

"जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर
CM Fadnavis Jamkhed
CM Fadnavis JamkhedPudhari
Published on
Updated on

जामखेड : विरोधक गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण बंद होणार असल्याचे ओरडत आहेत. त्यांना सांगतो की मी मुख्यमंत्री म्हणून पदावर आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत दिले.

CM Fadnavis Jamkhed
Ahilyanagar Blood Shortage: नगरमध्ये रक्त‌‘शून्य’बँका! 'ओ निगेटिव्ह' रक्तगट जिल्ह्यात कोठेही शिल्लक नाही; रुग्णांची ससेहोलपट

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तसेच आमदार सुरेश धस व योगेश टिळेकर, प्रा मधुकर राळेभात, प्रांजल अमित चिंतामणी आदी उपस्थित होते.

CM Fadnavis Jamkhed
Ahilyanagar Municipal Election: नगरात 'नंबर वन' कोण? ८ नगरपालिकांसाठी आज मतदान; महायुतीतच 'रेस', बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात आम्ही जे बोलतो ते आम्ही करतोच त्यामुळेच भाजपवर जनतेचा विश्वास आहे. राज्य सरकार फक्त लाडक्या बहिणीवरच अवलंबून नसून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता लखपती दीदी करण्याचा संकल्प केला आहे.

CM Fadnavis Jamkhed
Udarmal Leopard Attack: नगर तालुक्यात बिबट्याची दहशत संपेना! उदरमलमध्ये गाय-वासरावर हल्ला, शेळीचा फडशा

या वर्षी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आपण लखपती दीदी योजनेचा लाभ देणार आहोत. जलसंधारण कामांना जशी शहरी भागात अट रद्द केली, त्याच प्रकारे शहरी भागात रोजगार हमीसह विविध कृषी योजना लागू करण्यासाठी सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news