Ahilyanagar Bunty Jahagirdar Murder Case: बंटी जहागिरदार हत्येमागे बेग बंधूंचा आदेश; फिर्यादीत गंभीर आरोप

राजकीय व गुन्हेगारी वादातून खून झाल्याचा दावा; दोन आरोपी अटकेत
Bunty Jahagirdar Murder Case
Bunty Jahagirdar Murder CasePudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागिदारची हत्या बेग बंधूंच्या सांगण्यावरूनच आणि राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात अडचण निर्माण होत असल्याच्या रागातून करण्यात आल्याचा आरोप पोलिसात दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.

Bunty Jahagirdar Murder Case
Sangamner Cattle Smuggling: संगमनेरमध्ये गोवंश तस्करी उघड; कंटेनरमधून 28 जनावरे जप्त

रईस अब्दुलगणी शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिलेी. दरम्यान, पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात कोपरगाव येथून कृष्णा अरुण शिनगारे आणि रवींद्र गौतम निकाळजे या दोघांना अटक केली आहे.

Bunty Jahagirdar Murder Case
Rahuri Political Developments: राहुरीला दोन नगराध्यक्ष; प्रांजल चिंतामणींच्या सत्कारात तनपुरेंचे सूचक विधान

श्रीरामपूर येथील संतलुक हॉस्पिटलसमोर 31 डिसेंबरच्या दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागिरदारची हत्या केली. हत्या करणाऱ्या दोघांनी चन्या बेग, सोन्या बेग व टिप्या बेग यांच्या सांगण्यावरून बंटी जहागीरदार यास ठार मारले, असा आरोप रईस यांनी दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. बेग विधानसभेची निवडणूक थोड्या मतांनी पराभूत झाले होते, तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकीतही केलेल्या कामाचा राग हे हत्येमागील कारण असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. बेग याने जाहीर प्रक्षोभक भाषणात जहागिदारला चिथावणीखोर धमक्या दिल्याचा उल्लेखही फिर्यादीत केला आहे.

Bunty Jahagirdar Murder Case
Maharashtra Deputy Mayor Election: नगर जिल्ह्यात उपनगराध्यक्ष कोण? विशेष सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

दरम्यान, बंटी जहागिदारची हत्या होताच पोलिसांनी तपासासाठी तीन पथके नियुक्त केली. या पथकांनी ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपींचा माग शोधला. शिनगारे व निकाळजे हे दोघे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे जाऊन शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघांना बंटी जहागिदारच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

Bunty Jahagirdar Murder Case
Karjat Flex Permission Rule: कर्जत नगरपंचायतीचा आदर्श निर्णय; फ्लेक्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

बंटीचा खून का केला?, खून करण्यासाठी वापरलेला कट्टा (गावठी पिस्तूल) कोठून आणले?, खुनाचा कट कसा व कोठे आखला? आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे? या दृष्टीने अटकेतील दोघांकडे विचारपूस करण्यात येत आहे. दरम्यान, श्रीरामपुरातील तणाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरात एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news