Local Bodies Election| स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजप सज्ज: डॉ. स्वाधीन गाडेकर

राहात्याची 63 जणांची जम्बो कार्यकारिणी
BJP
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजप सज्ज: डॉ. स्वाधीन गाडेकरFile Photo
Published on
Updated on

एकरूखे: महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे. नुकतीच राहाता मंडलाची 63 जणांची जम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी दिली.

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी राहाता मंडलाची जम्बो कार्यकारणी मंडल आहे.या कार्यकारणीमध्ये दोन सरचिटणीस, सहा उपाध्यक्ष, सहा चिटणीस, कोषाध्यक्ष, 15 कार्यकारणी सदस्य, सात मोर्चाचे मंडल अध्यक्ष, 26 प्रकोष्ठचे संयोजक आदी मिळून 63 सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (Latest Ahilyanagar News)

BJP
Injured Deer Neglected: जखमी हरणावर उपचारास टाळाटाळ; करमनवाडीत वनविभागाची उदासीनता

यामध्ये सरचिटणीसपदी सचिन भैरवकर, किरण चोळके, उपाध्यक्षपदी संतोष सदाफळ, अंकुश भडांगे, सौ. कालिंदी भवर, ज्ञानेश्वर तुरकणे, गोवर्धन सरोदे, किरण सालपुरे, चिटणीसपदी रवींद्र आगलावे, चेतन गाडेकर बाळासाहेब सापते, भाऊसाहेब भांबरे, रवींद्र गुंजाळ, पंकज गोर्डे आणि कोषाध्यक्ष म्हणून पंकज कुलकर्णी आदींची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष: सागर कापसे, महिला मोर्चा अध्यक्षाः शोभाताई घोरपडे, किसान मोर्चा अध्यक्षः विनायकराव जपे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष: शरद गायकवाड, अनु.जाती मोर्चाः जॉन त्रिभुवन, अनु. जमाती मोर्चा: पुनीत बर्डे, अल्पसंख्यांक मोर्चा: आरिफ तांबोळी यांची निवड झाली आहे.

उद्योग आघाडी: प्रवीण देवकर, व्यापार आघाडी - प्रवीण वाकचौरे, उत्तर भारतीय आघाडीः साईकुमार गौड, दक्षिण भारतीय आघाडी: सोमेश वेलंगर, भटके विमुक्त आघाडीः चेतन रणमाळे, वैद्यकीय आघाडी: डॉ. अमोल बेंद्रे, कायदा आघाडी: अ‍ॅड. अतुलकुमार मालवदे, सहकार आघाडी: राजेश सदाफळ, मच्छिमार आघाडी: सिताराम आहेर ट्रान्सपोर्ट आघाडीः सागर घोगळ, सोशल मीडिया सेल: गणेश आरणे, माजी सैनिक सेल: रंजयकुमार सुलाखे, जेष्ठ कार्यकर्ता सेल: अशोकराव जमधडे, दिव्यांग सेल: सचिन पोटे, बुद्धिजीवी सेल: राजेंद्र निकाळे, शिक्षक सेल: माधव चौधरी, आध्यात्मिक आघाडी: विकास महाराज यादव, पदवीधर प्रकोष्ठ: नवनाथ शिरोळे, क्रीडा आघाडी: अ‍ॅड. गौरव बोर्डे, जैन आघाडी: रवींद्रकुमार कर्नावट, सांस्कृतिक सेल: शिल्पा कातोरे, आय.टी. सेल: प्रशांत डांगे, आयुष्यमान भारत सेल: अश्विनी बोठे, बेटी बचाव बेटी पढाव सेल: संदीप गाडेकर, पंचायत राज व ग्रामविकास सेल - अर्चना डांगे, राजस्थान आघाडी: खेतदान जीबा आदींची प्रकोष्ठ संयोजक म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे.

BJP
Chinchpur Pangul: जोरदार पावसासाठी शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून बालमभाई सय्यद, मनीषा चांगले, उत्तम हेंगडे, अजय रोहोम, दिपाली कान्होरे, भाऊसाहेब काळे, जयश्री वाणी, श्रुती चौधरी, वाल्मिक मोरे, विलास गोल्हार, प्रतिभा साळुंखे सागर कातोरे, अनिल डांगे हर्षल सातव, दर्शन गाढवे आदीची निवड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news