Chinchpur Pangul: जोरदार पावसासाठी शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे

यावर्षी मेमध्येच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
Chinchpur Pangul
जोरदार पावसासाठी शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडेPudhari
Published on
Updated on

Farmers Wating for Rain

चिंचपूर पांगूळ: यावर्षी मेमध्येच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बहुुतांस शेतकर्‍यांनी मेच्या शेवटच्या तर उर्वरित शेतकरयांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात खरीप हंगामातील मूग, कापूस, बाजरी, उडीद, तूर, सोयाबीन अश्या अनेक प्रकारच्या नगदी पिकांची पेरणी केली. परंतु पंधरा दिवसापासून पाऊस न पडलयाने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Latest Ahilyanagar News)

Chinchpur Pangul
Sinhagad Monsoon Tourism: सिंहगडावर हजारो पर्यटक; रिमझिम पाऊस अन् दाट धुक्यात वर्षाविहाराचा लुटला आनंद

यावर्षी मान्सूनचे आगमन जरी लवकर झाले असले तरी, पाथर्डी तालुक्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुकयातील करोडी, टाकळी मानूर, चिंचपूर पांगूळ, जोगेवाडी व पंचक्रोशीतील भागात अद्यापि शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत.

पुढील आठ दिवसांत पुरेेशा पाऊस जर पडला नाही, तर, शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. परिसरात जोरदार पाऊस पडावा, यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news