श्रीरामपूर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उबाठा शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे हे आज शनिवारी ठाणे येथे जाऊन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. मात्र दोघांचाही पक्ष प्रवेश वेगवेगळ्या वेळात होत आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे हे सध्या तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याची धुरा सांभाळत आहे. तसेच त्यांनी यापूर्वी 15 वर्षे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. (Latest Ahilyanagar News)
मात्र राष्ट्रवादीचे दोन तुकडे पडल्यानंतर ते अलिप्तच राहिले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शिंदे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार केला होता. तेव्हापासून त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र त्यांचा निर्णय लांबणीवर पडला होता. ते आज सकाळी 11 वाजता ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश करणार आहेत. तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व उबाठा शिवसेनेचे श्रीरामपूर शहर अध्यक्ष संजय छल्लारे आज संध्याकाळी चार वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
ते ससाणे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी केला काही वर्षांपूर्वी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा शिवसेनेत शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. श्रीरामपूरच्या विकासाच्या बाबतीत काहीच करता येत नसल्यामुळे त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पक्षप्रवेश आज सायंकाळी 5 वाजता ठाणे येथे होत आहे.