Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात शिर्डी हॉटेल कनेक्शन; ‘मेरी गोल्ड’वर ईडीचा छापा

नीलेश जपे यांची चौकशी सुरू; आर्थिक भागीदारीचा संशय, कोपरगावातही ईडीची कारवाई
Ashok Kharat
Ashok Kharat Casepudhari photo
Published on
Updated on

नगर: भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक शिर्डी कनेक्शन समोर आले आहे. खरात शिर्डीत आल्यानंतर हॉटेल मेरी गोल्डवर सतत मुक्काम ठोकत असल्याच्या माहितीवरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तसेच आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 23) एकाच वेळी छापे टाकले. हॉटेल मालक नीलेश जपे आणि भोंदू अशोक खरातमध्ये आर्थिक भागीदारी, अन्य व्यवहार होते का, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत ईडीची चौकशी सुरू होती.

Ashok Kharat
Municipal Council Controversy: कोपरगावात राष्ट्रवादीचा नगरपरिषद सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर, दीपक लोंढेसह अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांसह अनेकांची नावे चर्चेत आली. शिर्डीतील जमीन हडपल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता शिर्डीतील हॉटेल कनेक्शनही समोर येऊ पाहत आहे. त्यादृष्टीने यंत्रणांचा तपास सुरू आहे. त्याची सत्यता पडताळणीसाठी ‌‘मेरी गोल्ड‌’चे मालक निलेश जपे यांच्याभोवती संशयाचे कडे उभे राहिल्याचे चित्र आहे.

Ashok Kharat
Dengue Cases: भालगावात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण; घरोघरी तपासणी मोहीम

भोंदू खरात जेव्हा जेव्हा शिर्डीत येत तेव्हा तेव्हा तो ‌‘मेरी गोल्ड‌’मध्ये मुक्कामी असायचा. खरातची शिर्डीतील हॉटेलमध्ये भागीदार असल्याचा संशय आहे. भागीदारीपोटी त्याने ‌‘रोकडा‌’ गुंतवणूक केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची जपे यांची चौकशी केल्याचे समजते. जपे आणि खरातचे काही आर्थिक व्यवहार आहेत का?, खरात हॉटेलमध्ये आल्यानंतर तेथून काही व्यवहार करत होता का? याचा तपास सुरू आहे. आयकर व ईडीच्या अधिकाऱ्यांकडून 12 तास ‌‘मेरी गोल्ड‌’मध्ये चौकशी सुरू आहे.

Ashok Kharat
Power Cut News: ऐन उन्हाळ्यात विजेचा लंपडाव; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

हॉटेलमध्ये ‌‘खरात‌’ नावाची पेटिंग?

भोंदू अशोक खरातने शिर्डीत मोठे आर्थिक साम्राज्य उभे केल्याची चर्चा आहे. संस्थानच्या चार नंबर गेट परिसरातील हॉटेलमध्ये खरातची भागीदारी असल्याची चर्चा आहे. या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर खरातच्या नावे पेटिंग केल्याचे समजते. शिर्डीत साम्राज्य उभे करताना खरातला एजंटांना हातभार लावला. आता खरातशी संबंधित सगळेच ईडीच्या रडारवर आले आहेत. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी एजंटांनी ‌‘मी नाही त्यातली..‌’ची भूमिका घेत चुप्पी साधल्याची चर्चा शिर्डीत आहे.

Ashok Kharat
Blackmail Case: ब्लॅकमेल करून तरुणीवर अत्याचार; खोटे मॅरेज सर्टिफिकेट छापून लग्नही मोडले

कोपरगावातही ईडीची दस्तक!

नीलेश जपे हे मोठे उद्योजक आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल ईडीकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. त्यासाठी ईडीचे पथक कोपरगावात दाखल झाले होते. जपे यांच्याशी खरातचे काही आर्थिक व्यवहार झाले का? याची चौकशी सुरू आहे. खरात-जपे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय ईडीला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news