Ashok Kharat: भोंदू अशोक खरात सात दिवस पोलिस कोठडीत; कोटींच्या व्यवहारांचे गूढ उलगडणार

फसवणूक प्रकरणात राहाता न्यायालयाचा आदेश; १०८ खात्यांचा नॉमिनी असल्याची धक्कादायक माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपास वेगात
Ashok Kharat
Ashok Kharatpudhari photo
Published on
Updated on

नगर: राहाता पोलिस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Ashok Kharat
Kopargaon Truck Accident: ओव्हरटेकचा जीवघेणा प्रयत्न! शिर्डी संस्थानच्या महिला कर्मचाऱ्याचा मालमोटारीखाली चिरडून मृत्यू

मुबंईतील दिनेश परब यांनी राहाता पोलिसात दिलेल्या फसणुकीच्या गुन्ह्यात खरातला वर्ग करण्यात आले आहे. गोकर्ण-महाबळेश्वर येथे ट्रिपला जायचे सांगत खरातने परब यांचे आधार कार्ड, फोटो घेतले होते. त्याचा वापर करून पतसंस्थेत खाते उघडले अन्‌ १ कोटीचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. पतसंस्थेतील सुमारे १०८ खात्यांना खरात हा नॉमिनी असल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर पोलिस आता त्याचा उलगडा करणार असल्याचे समजते.

Ashok Kharat
Shirdi Sai Baba Guru Purnima Donation: गुरुपौर्णिमेला साईचरणी भक्तांचा महासागर; तीन दिवसांत ३ लाख भाविक, ७.८१ कोटींची देणगी

शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनीही जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा गुन्हा अशोक खरात विरोधात नोंदविण्यात आला आहे. एसआयटीने शुक्रवारी खरातला शिर्डीच्या गुन्ह्यात अटक केली. शनिवारी न्यायालयात एसआयटीचे तपास अधिकारी अमोल भारती, सरकारी वकिल अभिषेक नागरे यांनी बाजू मांडली. खरातच्यावतीने ॲड. व्यंकटेश खिस्ते यांनी युक्तीवाद केला.

Ashok Kharat
Shrigonda Police Campaign: श्रीगोंदा पोलिसांची ‘अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम’; १५ दिवसांत १४६ प्रकरणांचा निपटारा

खरातने कोट्यवधींचे व्यवहार केले असून हा पैसा कोठून आला?, व्यवहारातील लाभार्थी कोण? आणि त्यासाठी त्याला कोणी कोणी मदत केली? याचा तपास करण्यासाठी सरकार पक्षातर्फे पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

पतसंस्थेतील खाते उघडण्यासाठी खातेदारांनीच कागदपत्रे दिली, कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचा दावा आधारहिन असल्याचा बचावात्मक युक्तीवाद खरातच्यावतीने ॲड. खिस्ते यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news